worli bandra sea link news : वरळी-वांद्रे सी लिंकवरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहने जात असतात. या मार्गावरून फक्त चार चाकी वाहने नेण्यास परवानगी आहे. मात्र, असे असतांना सोमवारी एका महिलेने जबरदस्तीने या मार्गवरुन दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब एका पोलिस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने त्याने तिला रोखले. मात्र, दुचाकी सोडून ही महिला महामार्गावर पळू लागली. या महिलेचा पाठलाग करून पोलिस कर्मचाऱ्याने तिला ताब्यात घेतल्याने या मार्गवारील मोठी दुर्घटना टळली आहे.
वरळी-वांद्रे सी लिंक हा मुंबईतील महत्वाचा मार्ग आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वेगवान प्रवासाठी या मार्गाचा वापर करत मोठ्या प्रमाणात वाहने येथून जात असतात. या मार्गावर फक्त चारचाकी वाहनांना प्रवेश आहे. मात्र, सोमवारी या मार्गावर एका मानसिक संतुलन खराब झालेल्या महिलेने धुडघूस घातला. तिच्यामुळे या मार्गवार मोठा अपघात होणार होता.
मात्र, एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवल्याने ही दुर्घटना टळली. या महिलेने तिची दुचाकी ही या मार्गे नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब त्या ठिकाणी असलेले पोलिस अंमलदार गणेश पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने तिला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र, महिलेने दुचाकी तेथेच टाकून या मार्गावर पळत सुटली.
गणेश पाटील यांनी देखील तिचा पाठलाग करून या महिलेला ताब्यात घेतले. दरम्यान, या महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समजले. वाहतूक पोलीस अंमलदार गणेश पाटीलांनी दाखवलेल्या प्रसंगावधान व तत्परतेपुळे मोठा अनर्थ टळला. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले.
संबंधित बातम्या