मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai : धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना पाय घसरून पडल्यानं शिक्षिकेचा मृत्यू

Mumbai : धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना पाय घसरून पडल्यानं शिक्षिकेचा मृत्यू

Jan 13, 2023, 08:21 AM IST

  • School Teacher train Accident news: मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताना पडून एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Local Train

School Teacher train Accident news: मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताना पडून एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे.

  • School Teacher train Accident news: मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताना पडून एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे.

Mumbai School Teacher train Accident news: मुंबईतील बोरिवली स्थानकावर नुकतीच सुरू झालेली लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना पडल्यानं एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. प्रगती घरत (४३) असं या शिक्षिकेचं नाव आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

प्रगती घरत या मालाड येथील एका शाळेत शिक्षिका होत्या. त्या वसई इथं राहत होत्या. त्या दर दिवशी बोरिवली इथं ट्रेन बदलायच्या. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या बोरिवली स्थानकावर उतरल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून सुटणाऱ्या चर्चगेट ट्रेनच्या सेकंड क्लासच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. मात्र, ट्रेन नुकतीच सुरू झाली होती. ती पकडण्याच्या नादात त्यांचा पाय घसरला आणि त्या प्लॅटफॉम व ट्रेनच्या मधील मोकळ्या जागेत अडकल्या. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. 

पोलिसांनी तातडीनं त्यांना अॅपेक्स रुग्णालयात दाखल करून त्यांच्या नातेवाईकांना ही माहिती दिली. त्यानंतर प्रगती घरत यांना अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथं उपचारादरम्यान दुपारी पावणे दोनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. बोरिवली रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या