मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वरळीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारने चिरडल्याने नागरिक संतप्त, पोलीस ठाण्यासमोरच...

वरळीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारने चिरडल्याने नागरिक संतप्त, पोलीस ठाण्यासमोरच...

Mar 20, 2023, 10:30 AM IST

  • मुंबईच्या वरळी सी फेसवर रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेला भरधाव कारने चिरडल्यामुळे नागरिकांनी वरळी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.

Worli Car Accident Case

मुंबईच्या वरळी सी फेसवर रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेला भरधाव कारने चिरडल्यामुळे नागरिकांनी वरळी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.

  • मुंबईच्या वरळी सी फेसवर रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेला भरधाव कारने चिरडल्यामुळे नागरिकांनी वरळी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.

Mumbai Crime: मुंबईच्या वरळी सी फेसवर रविवारी भरधाव कारने मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेला चिरडले. या अपघात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वरळी पोलिसांनी आरोपी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेने वरळीतील नागरिकांमध्ये संतपाची लाट उसळली आहे. दरम्यान, अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी निघलेल्या नागरिकांनी थेट वरळी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन पुकारले.

ट्रेंडिंग न्यूज

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

राजलक्ष्मी राजकृष्णन असे अपघात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. राजलक्ष्मी या रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारात एका भरधाव कारने त्यांना चिरडले. या अपघातात राजलक्ष्मी गंभीर जखमी झाला. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने तिला नायर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून महिलेला मृत घोषित केले.

सुमेर मर्चंट (वय, २३) असे आरोपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आरोपीलाही अपघातात दुखापत झाली आहे. आरोपी मैत्रीणीला सोडून परत येताना त्याच्या कारला अपघात झाला आहे. वरळी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने दारूचे सेवन केले होते का ते तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या