मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Black Cocaine : देशात पहिल्यांदाच सापडले ब्लॅक कोकेन, मुंबईत NCBने जप्त केला कोट्यवधींचा मुद्देमाल

Black Cocaine : देशात पहिल्यांदाच सापडले ब्लॅक कोकेन, मुंबईत NCBने जप्त केला कोट्यवधींचा मुद्देमाल

Sep 29, 2022, 02:41 PM IST

    • Black Cocaine: एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक अमित गवाते यांनी सांगितले की, ब्लॅक कोकेन पकडणं कठीण असतं. डॉग स्क्वॉडसुद्धा ह्याचा गंध ओळखू शकत नाहीत.
मुंबईत एनसीबीने पकडले ब्लॅक कोकेन, कोट्यवधांचा माल जप्त

Black Cocaine: एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक अमित गवाते यांनी सांगितले की, ब्लॅक कोकेन पकडणं कठीण असतं. डॉग स्क्वॉडसुद्धा ह्याचा गंध ओळखू शकत नाहीत.

    • Black Cocaine: एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक अमित गवाते यांनी सांगितले की, ब्लॅक कोकेन पकडणं कठीण असतं. डॉग स्क्वॉडसुद्धा ह्याचा गंध ओळखू शकत नाहीत.

Black Cocaine: देशात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सातत्याने कारवाया केल्या जातात. आता एनसीबीला मुंबईत मोठं यश मिळालं असून पहिल्यांदाच देशात ब्लॅक कोकेनचा साठा पकडण्यात आला आहे. मुंबई विभागाने मोठ्या प्रमाणावर ब्लॅक कोकेन जप्त केलं आहे. तीन किलोग्रॅम वजनाच्या या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास तीन कोटी रुपये इतकी किंमत असल्याचं सांगण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक अमित गवाते यांनी सांगितले की, ब्लॅक कोकेन पकडणं कठीण असतं. डॉग स्क्वॉडसुद्धा ह्याचा गंध ओळखू शकत नाहीत. यामागे कारण आहे ते म्हणजे सामान्य कोकेनचा गंध येतो. पण ब्लॅक कोकेनमध्ये गंधच येत नाही. त्यामुळे ब्लॅक कोकेन ओळखणं कठीण आहे. भारतात पहिल्यांदाच ब्लॅक कोकेनची तस्करी झाली आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक कोकेनबाबत पिनपॉइंट इन्फर्मेशन होती. ब्लॅक कोकेन मुंबईतून गोव्याला नेण्यात येणार होतं. अजुनही एनसीबीची तपास मोहिम सुरू आहे.

एनसीबीने ट्विटरवरून ब्लॅक कोकेनच्या तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याचं सांगितलं आहे. त्यात म्हटलं की, एनसीबीने ब्राझीलवरून आलेलं ३.२० किलो उच्च दर्जाचं ब्लॅक कोकेन जप्त केलं आहे. हे सर्व एका मोहिमेंतर्गत शक्य झालं आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांमधून हे ब्लॅक कोकेन घेऊन येणाऱ्यांना आणि ते इथे घेणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या