मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Train : लोकल रेल्वेची ऑनलाइन तिकीट सेवा बंद; तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा संताप

Mumbai Local Train : लोकल रेल्वेची ऑनलाइन तिकीट सेवा बंद; तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा संताप

Jul 26, 2023, 09:50 AM IST

    • Mumbai Local Train Website : ऑनलाईन तिकीट बुकिंग होत नसल्याने असंख्य प्रवाशांनी बुकिंगसाठी थेट रेल्वे स्टेशन्सवर धाव घेतल्याने मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
Mumbai Local Train Website (HT)

Mumbai Local Train Website : ऑनलाईन तिकीट बुकिंग होत नसल्याने असंख्य प्रवाशांनी बुकिंगसाठी थेट रेल्वे स्टेशन्सवर धाव घेतल्याने मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

    • Mumbai Local Train Website : ऑनलाईन तिकीट बुकिंग होत नसल्याने असंख्य प्रवाशांनी बुकिंगसाठी थेट रेल्वे स्टेशन्सवर धाव घेतल्याने मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

Mumbai Local Train Website : देशातील सर्वात व्यस्त शहर असलेल्या मुंबईत लोकल रेल्वेची बुकिंग सेवा काही तासांसाठी ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री २.५६ वाजेपासून तर मंगळवारी दुपारी १.२८ वाजेपर्यंत बुकिंग सेवा बंद झाल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. इंडियन रेल्वे कॅटिरग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनची वेबसाईट्स आणि अ‍ॅपची सेवा खंडीत झाल्याने त्याचा लाखो प्रवाशांना फटका बसला आहे. तब्बल साडेदहा तास बुकिंग सेवा बंद झाल्याने प्रवाशांनी तातडीने रेल्वे स्थानकांच्या खिडक्यांवर येत तिकीट खरेदी करण्यात सुरुवात केली. परिणामी रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करत ऑनलाईन सेवा सुरळीत केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्टेशनवरील एटीव्हीएम यंत्र, यूटीएस अ‍ॅपमधून ऑनलाइन बुकिंग तसेच व्यवहार करण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळं संतापलेल्या प्रवाशांना तिकीट बुकिंग करण्यासाठी स्थानकांवरील खिडक्यांवर धाव घ्यावी लागली. त्यामुळं तिकीट काढण्यासाठी खिडक्यांसमोर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आयआरसीटीसीचे संकेतस्थळ आणि अ‍ॅपमधून तिकीट बुकिंग होत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. याशिवाय मुंबईसह ठाणे आणि उपनगरांच्या भागांत मुसळधार पाऊस सुरू असताना देखील प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर तिकीट साठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सेवा सुरळीत करण्यात आल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

तिकीट बुकिंगची ऑनलाईन सेवा बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वेकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी खिडकीवरून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यासाठी रेल्वेने तब्बल १२ पीआरएस तिकीट आरक्षण केंद्रे सुरू करून दिली होती. सीएसएमटी स्टेशनवर पाच, कल्याणमध्ये दोन, ठाणे वर्तकनगर, वाशी, मुलुंड, बदलापूर, चेंबूर या स्थानकांवरही प्रवाशांना तिकीट बुकिंगची सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. रेल्वेची वेबसाईट आणि अ‍ॅपवर तिकीट बुकिंग करण्यात अडचणी येत असल्याने खासगी तिकीट आरक्षण अ‍ॅपवरून तिकीट काढण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं. सेवा सुरळीत करण्यात आल्यानंतर प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.

पुढील बातम्या