मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Mega Block : मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक; पाहा लोकलचं बदललेलं वेळापत्रक

Mumbai Local Mega Block : मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक; पाहा लोकलचं बदललेलं वेळापत्रक

Jul 30, 2023, 06:38 AM IST

    • Mumbai Local Mega Block : रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी लोकल रेल्वेकडून आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
mumbai local mega block news today (HT)

Mumbai Local Mega Block : रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी लोकल रेल्वेकडून आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

    • Mumbai Local Mega Block : रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी लोकल रेल्वेकडून आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

mumbai local mega block news today : रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती आणि अभियांत्रिकी कामांसाठी आज मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तिन्ही मार्गांवर वेगवेगळ्या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने वीकेंडला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. मेगाब्लॉकमुळं अनेक लांब पल्ल्याच्या आणि लोकल रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळं आता ऐन वीकेंडलाच मेगाब्लॉक घेण्यात आल्याने मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं आता वीकेंडला बाहेर पडणाऱ्यांनी रेल्वेचं सुधारीत वेळापत्रक पाहायलाच हवं. लोकलसह अनेक सुपरफास्ट रेल्वेंचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर ठाणे आणि कल्याण दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळं सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या आणि सीएसएमटीहून येणाऱ्या लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्या १० ते १५ मिनिटे उशीराने धावणार आहे. वसई रोड – दिवा मेमू या मार्गावर धावणारी सकाळची लोकल कोप पर्यंतच धावणार आहे. मेमू कोपर – दिव्या दरम्यानची रेल्वे तात्पुरती रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळं मेगाब्लॉकचा मोठा परिणाम मध्य रेल्वेमार्गावरील वाहतुकीवर होणार आहे.

मुंबईतील हार्बर मार्गावर पनवेल-वाशी दरम्यान आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी आणि सीएसटीहून पनवेल आणि बेलापूरकडे येणारी लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं नवी मुंबईहून सीएसटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

पश्चिम मार्गावरील मरिन लाइन्स ते माहिम डाऊन या धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळं डाऊन धिम्या मार्गावरील लोकल रेल्वे मरिन लाइन्स ते माहिम स्थानकांवरील जलद मार्गावर वळविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

पुढील बातम्या