Live News Updates 30 July 2023 : मणिपूर बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Live News Updates 30 July 2023 : मणिपुरमध्ये तीन महिलांची विवस्त्र धिंड काढत त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती.
Sun, 30 Jul 202301:21 PM IST
महाराष्ट्रात २ हजार तर छत्रपती संभाजीनगरात ९६ वीज कामगारांनी केले रक्तदान थॅलॅसिमिया रुग्णांकरिता वीज कामगारांचा उपक्रम
महाराष्ट्र वीज कामगार महासंघ नियमित विविध समजोपयोगी उपक्रम राबवत असतो. पूरपरिस्थिती असेल, दुष्काळ असेल, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत असेल किंवा नुकतेच येऊन गेलेले कोरोनाचे संकट असेल, या सर्वच वेळी कामगार महासंघ देशासोबत सामाजिक उत्तरदायित्व म्हणून नेहमीच मदतीसाठी तत्पर असतो. याच राष्ट्रभावनेतून महासंघाचे दत्तोपंत ठेंगडी, बाळासाहेब साठ्ये, आण्णाजी आकोटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा मुख्यालयात महारक्तदान शिबिर आयोजिन केले होते. या महारक्तदान शिबिरात महाराष्ट्रभर जवळपास २ हजार रक्तदात्यानी सहभाग घेऊन रक्तदान केले.
Sun, 30 Jul 202309:27 AM IST
Policy bazaar : पाॅलिसी बाझारची व्यावसायिक विमा सेवा सुरू
पॉलिसीबाझार या विमा सेवा देणाऱ्या ऑनलाइन कंपनीने गेल्या १५ वर्षांमध्ये विमा खरेदी करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे. विश्वासार्हता आणि पारदर्शकता या बळावर कंपनीने विमाखरेदीसाठी अंतिम पर्याय अशी ओळख निर्माण केली आहे. सल्ला सेवा आणि प्रगत तंत्रज्ञानासह कॉर्पोरेट विमा क्षेत्रात प्रभावी कामगिरी करण्यासाठी आणि कॉर्पोरेट विमा ग्राहकांसोबत आपले नाते मजबूत करण्याच्या उद्देशाने पॉलिसीबझार फॉर बिझनेस अर्थात व्यवसायासाठी पॉलिसीबझार सेवा सुरू केली आहे.
Sun, 30 Jul 202305:53 AM IST
Pune Water Supply : पुणे शहरातील पाणीकपात रद्द, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा
Pune Water Supply : गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे शहरात सुरू असलेली पाणीकपात अखेर रद्द करण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी पाणीकपात रद्द करत असल्याचं जाहीर केलं आहे.
Sun, 30 Jul 202305:51 AM IST
Mumbai Weather Update : मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
Mumbai Weather Update : पुढील २४ तासांत मुंबईसह ठाणे आणि उपनगरांच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Sun, 30 Jul 202312:51 AM IST
Thane News : पावसामुळं ठाण्यातील रस्त्यांची दाणादाण, नागरिकांकडून संताप
Thane News : गेल्या चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहे. रस्त्यांवर पाणी साचत असल्याने अनेकांना अपघात होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळं आता प्रशासनाने तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Sun, 30 Jul 202312:51 AM IST
Mumbai Local Mega Block : मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक
Mumbai Local Mega Block : रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी लोकल रेल्वेकडून आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तिन्ही मार्गांवर वेगवेगळ्या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने मुंबईकरांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
Sun, 30 Jul 202312:50 AM IST
Manipur Rape Case : मणिपूर बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Manipur Rape Case : मणिपुरमध्ये तीन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती. या घटनचे केंद्रातील मोदी सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. कारण आता या बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.