मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dead Body on Dadar Beach : दादर समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ; हत्येचा संशय

Dead Body on Dadar Beach : दादर समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ; हत्येचा संशय

Apr 21, 2024, 11:31 AM IST

  • Mumbai Dadar Murder News: मुंबई येथील दादर समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.

दादर समुद्रकिनाऱ्यावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.

Mumbai Dadar Murder News: मुंबई येथील दादर समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.

  • Mumbai Dadar Murder News: मुंबई येथील दादर समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.

Dead Body Found On Mumbais Dadar Beach: दादर समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी दुपारी (१९ एप्रिल २०२४) एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्यांनी दादर पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असतात तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. अज्ञात व्यक्तीची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह समुद्रात फेकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Urulikanchan news : वीज पडल्याचा आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

Pimpri chinchwad: पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बराच वेळ पाण्यात होता, असे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले. तसेच या व्यक्तीच्या डोक्याला मार लागला असून त्याच्या कमरेवर आणि हातावर चाकूच्या जखमा होत्या. पोलिसांना अद्याप त्याची ओळख पटवली नाही. मृताच्या एका हातावर इंग्रजीत 'ज्योती' आणि दुसरीकडे हिंदीत 'रंजना' असा टॅटू आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

D. S. Kulkarni: मोठी बातमी! पुण्यात जेएम रोडवर डीएसके यांच्या कार्यालयावर ईडीच्या पथकाची छापेमारी

बेपत्ता झालेल्या लोकांच्या नोंदीची तपासणी

मृताने जीन्स, पँट आणि टी-शर्ट परिधान केला होता. त्याचा फोटो सध्या राज्यभर फिरत आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके पीडितेची ओळख पटविण्यासाठी काम करत आहेत, जेणेकरून त्यांना त्याची हत्या करणाऱ्या आणि नंतर त्याचा मृतदेह समुद्रात फेकणाऱ्या आरोपींचा शोध घेता येईल.पीडितेची ओळख पटविण्यासाठी शहरासह राज्याच्या इतर भागातून बेपत्ता झालेल्या लोकांच्या नोंदी तपासल्या जात आहेत.

मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू

दादर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दादरच्या चौपाटीलगत कीर्ती कॉलेजजवळ १८ जानेवारीला हा मृतदेह आढळून आला होता. आम्ही या घटनेसंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे आणि मृताची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर हत्येमागचे कारण समजू शकेल. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या