मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sardar Khan : मनी लाँड्रिंग, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी सरदार खानला मुंबई न्यायालयाने मंजूर केला जामीन

Sardar Khan : मनी लाँड्रिंग, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी सरदार खानला मुंबई न्यायालयाने मंजूर केला जामीन

Jun 07, 2023, 11:38 AM IST

    • Mumbai court grants bail to 1993 bomb blasts case convict Sardar Khan : मनी लाँड्रिंग तसेच मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असलेल्या सरदार खानला मुंबई उच्च न्यायल्याने जामीन मंजूर केला आहे. सरदार खान हा दाऊदचा खास साथीदार आहे.
Mumbai high Court

Mumbai court grants bail to 1993 bomb blasts case convict Sardar Khan : मनी लाँड्रिंग तसेच मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असलेल्या सरदार खानला मुंबई उच्च न्यायल्याने जामीन मंजूर केला आहे. सरदार खान हा दाऊदचा खास साथीदार आहे.

    • Mumbai court grants bail to 1993 bomb blasts case convict Sardar Khan : मनी लाँड्रिंग तसेच मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असलेल्या सरदार खानला मुंबई उच्च न्यायल्याने जामीन मंजूर केला आहे. सरदार खान हा दाऊदचा खास साथीदार आहे.

मुंबई: १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेल्या सरदार खानला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Kolhapur Bandh: आक्षेपार्ह स्टेटसचे कोल्हापुरात पडसाद; हिंदू संघटनांनी दिली बंदची हाक

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए), आर एन रोकडे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायाधीशांनी सरदार खानला जामीन मंजूर केला. दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. खान सध्या बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून टु सध्या औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला जमिन मिळाला असला तरी त्याची बॉम्बस्फोट प्रकरणातून सुटका झालेली नाही.

heat wave alert : सावधान ! मॉन्सून लांबल्याने राज्यात उष्णतेची लाट येणार, घरा बाहेर पडतांना घ्या काळजी

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना आधी जामीन नाकारला होता. मलिक विरुद्ध ईडीचा खटला राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवादी आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला दाऊद इब्राहिम यांच्याशी त्यांचा संबंध असल्याचा त्यांचावर आरोप आहे. 

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) म्हणण्यानुसार, खानने मलिकला दाऊदची बहीण हसीना पारकरसोबत जमिनीचा करार करण्यासाठी मदत केली होती. या प्रकरणात अटक न झाल्याने खान यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम ८८ अंतर्गत जामीन मागितला होता. हे कलम स्वीकारल्यानंतर आरोपीला सोडण्याचा अधिकार न्यायालयाल देत असल्याने खान यांना जामीन देण्यात आला आहे. दरम्यान, मुख्य आरोपी मलिक यांना ईडीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. ते न्यायालयीन कोठडीत असून सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या