कोल्हापूर : शिवराज्यभिषेक दिनी कोल्हापुरात काही तरुणांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. या घटनेचे मोठे पडसाद शहरात उमटले होते. शहरात काही भागात तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कारवाईच्या मागणीसाठी आज हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला आहे. शहरात कडकडीत बंद पाळला जाणार आहे. या सोबतच काही संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत आंदोलन करणार आहेत.
शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या दिवशी काही तरुणांनी आक्षेपार्ह व्हाॅट्सअॅप स्टेट्स ठेवले होते. यामुळे तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या तरूणांवर कारवाईची मागणी करण्यासाठी लक्ष्मीपुरी, शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांनी ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर शहरात काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले. पोलिसांनी जमावाला पांगवले होते. मंगळवारी रात्री पर्यंत शहरात तणाव होता.
या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह स्टेटस लावण्यावरुन निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रात्री दिला आहे. पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊन वा स्टेटसमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकतो. अहवालानुसार अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी १९ जूनच्या रात्री बारापर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे.
दरम्यान, या प्रकारचा निषेध करण्यासाठी आज हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आज बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. सर संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमणार असून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शहरातील मुख्य बाजारपेठांमधून मोर्चा काढून बंदचे आवाहन केले जाणार आहे. दरम्यान, हा मोर्चा शांततेत पार पाडवा तसेच बंद साठी दमदाटी करू नये असे आवाहन बंडा साळोखे यांनी केलं आहे.