मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Airport : विमान उड्डाणाच्या साडेतीन तास आधी विमानतळावर पोहोचा; प्रवाशांसाठी नव्या गाइडलाइन्स

Mumbai Airport : विमान उड्डाणाच्या साडेतीन तास आधी विमानतळावर पोहोचा; प्रवाशांसाठी नव्या गाइडलाइन्स

Dec 09, 2022, 04:54 PM IST

  • Mumbai Airport : मुंबई विमानतळ प्रशासनाने प्रवाशांसाठी नव्या गाइडलाइन्स प्रसिद्ध केल्या असून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना साडे तीन आधी तर देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांना किमान अडीच तास आधी विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे. 

मुंबई विमानतळ

Mumbai Airport : मुंबई विमानतळ प्रशासनाने प्रवाशांसाठी नव्या गाइडलाइन्स प्रसिद्ध केल्या असून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना साडे तीन आधी तर देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांना किमान अडीच तास आधी विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे.

  • Mumbai Airport : मुंबई विमानतळ प्रशासनाने प्रवाशांसाठी नव्या गाइडलाइन्स प्रसिद्ध केल्या असून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना साडे तीन आधी तर देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांना किमान अडीच तास आधी विमानतळावर पोहोचणे आवश्यक आहे. 

मुंबई – देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असणाऱ्या मुंबई विमानतळ प्रशासनाकडून प्रवाशांसाठी नव्या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. वर्षाखेरीस विमानतळावर होणारी गर्दी लक्षात घेता प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी किमान साडेतीन तास आधी विमानतळावर दाखल होणे आवश्यक आहे तर देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमान उड्डाणाच्या किमान अडीच तास आधी पोहोचावं लागणार आहे. विमानतळावर इमिग्रेशनसाठी होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विमानतळ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

Maharashtra Weather Update: पुणे, कोल्हापूर, सातारा, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता! मुंबईत उकाडा कायम

आज केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुंबई विमानतळावर होत असलेली गर्दी आणि एअर ट्रफिक याचा आढावा घेतला. यानंतर प्रवाशांसाठी या नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विमानतळांचा आढावा घेतल्यानंतर मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमानतळ प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी देशातील सर्व प्रमुख विमानतळांवर सुरक्षा क्षमतेनुसार महत्त्वाच्या उड्डाणकाळांचे नियोजन करण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  याशिवाय प्रवासी सामानाची तपासणी करणाऱ्या मशिनबाबत आढावा घेण्याचेही सांगण्यात आले आहे.

नाताळ ववर्षा अखेरीस सुट्ट्यांमुळे मुंबईत विमानतळांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. येणाऱ्या काही दिवसात गर्दीत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी बोर्डिंग पास व अन्य आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विमानतळावर लवकर पोहोचावे, असे सांगण्यात आले आहे. विमानतळांवर कामाचा खोळंबा होऊ नये, विमान वाहतुकीची कोंडी अन् गर्दी टाळण्यासाठी नियोजन करावं अशा सुचना केंद्राकडून विमानतळ प्रशासनासह संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या