मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Airport: मुंबई विमानतळावरील सर्व्हर डाऊन; check-in साठी प्रवाशांच्या रांगा, उड्डाणे विलंबाने

Mumbai Airport: मुंबई विमानतळावरील सर्व्हर डाऊन; check-in साठी प्रवाशांच्या रांगा, उड्डाणे विलंबाने

Dec 01, 2022, 07:10 PM IST

  • Mumbai Airport Server Down : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाल्याने चेक इनची यंत्रणा ठप्प झाली होती. जवळपास दोन तासानंतर ही यंत्रणा पूर्ववत सुरू झाली. चेक-इन व बोर्डिंग पाससाठी प्रवासांच्या रांगा लागल्या होत्या.

मुंबई विमानतळावरील सर्व्हर डाऊन

Mumbai Airport Server Down : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाल्याने चेक इनची यंत्रणा ठप्प झाली होती. जवळपास दोन तासानंतर ही यंत्रणा पूर्ववत सुरू झाली. चेक-इन व बोर्डिंग पाससाठी प्रवासांच्या रांगा लागल्या होत्या.

  • Mumbai Airport Server Down : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाल्याने चेक इनची यंत्रणा ठप्प झाली होती. जवळपास दोन तासानंतर ही यंत्रणा पूर्ववत सुरू झाली. चेक-इन व बोर्डिंग पाससाठी प्रवासांच्या रांगा लागल्या होत्या.

देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावरील (Mumbai international airport) सर्व्हर डाऊन (server down) झाल्याने चेक इन यंत्रणा ठप्प झाली आहे. गेल्या जवळपास ५० मिनिटांपासूनचेक इन करताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे सर्व कंपन्यांच्या विमानसेवेवर परिणाम झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

विमानतळावरील सर्व यंत्रणा बंद पडल्यामुळे मागील ५० मिनिटांपासून प्रवासी चेक इन साठी रांगा लागून आहेत. एमआयएएलच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे डीआयजी श्रीकांत किशोर यांनी सांगितले की, विमानतळावरील सर्व काउंटरवर प्रवाशांची लांब रांग लागली आहे. विस्तारा एअरलाईनच्या प्रवक्त्याने सांगितले की,सर्व विमान कंपन्यांवर याचा परिणाम झाला आहे. चेक इन ची यंत्रणा ठप्प झाल्याने विमान उड्डाणावरही परिणाम होऊन अनेक विमानांनी उशिराने उड्डाण केलं.

सर्व्हर डाऊन झाल्यामुळे प्रवासी डेटासंबंधी संपूर्ण काम ठप्प झाले आहे. प्रवाशांची तपासणी, बॅगेज काऊंटर, चेक इन, बोर्डिंग पास देणेसर्व थांबले आहे. दुपारी साडे चार ते साडे सहा दरम्यान यंत्रणा ठप्प होती. त्यामुळे लोकांना बोर्डिंग पास दिले जात नव्हते. विविध विमान कंपन्यांच्या डेस्कसमोर प्रवाशांच्या रांगाच रांगा होत्या.

एमआयएएल प्रवक्त्याने सांगितले की, विमानतळ प्रशासन या समस्येवर काम करत आहे. लवकरच सर्व यंत्रणा पूर्ववत केली जाईल. प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार मदत केली जात आहे. ऑप्टिक फायबर केबल खराब झाल्यामुळे सिस्टम ब्लॅकआउट झाली आहे.

 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन असल्याने गर्दी नेहमीपेक्षा अधिक आहे. गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित केले जात आहे आणि प्रवाशांना मॅन्युअली पास दिले जात असल्याने गोंधळ नसल्याचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे.

दरम्यान ही ठप्प झालेली यंत्रणा ६ वाजून ३५ मिनिटांनी पूर्ववत करण्यात आल्याची माहिती एमआयएएलच्या प्रवक्त्याने दिली आहे. जवळपास दोन तास सर्व्हर डाऊन होता. त्यामुळे कोणतेही उड्डाण होऊ शकले नाही. प्रवाशांना पास देण्याचे काम सुरू झाल्याने थोड्या वेळात गर्दीवर नियंत्रण मिळवले जाईल असे सांगण्यात येत आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या