मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut Bail : जामीन मिळाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Sanjay Raut Bail : जामीन मिळाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Nov 09, 2022, 06:06 PM IST

    • Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय भावूक झाले होते. त्यावेळी संजय राऊतांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut

Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय भावूक झाले होते. त्यावेळी संजय राऊतांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    • Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय भावूक झाले होते. त्यावेळी संजय राऊतांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut Bail By PMLA Court : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या संजय राऊतांना अखेर आज मुंबईतील पीएमएलए कोर्टानं जामीन मंजुर केला आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय दिलासा मिळाला आहे. ईडीनं संजय राऊतांचा जामीन स्थगित करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकांना फेटाळून लावत राऊतांना दिलेला जामीन कायम ठेवला आहे. त्यानंतर आता जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी राहणार बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

जामीन कायम ठेवण्याचा निकाल कोर्टानं दिल्यानंतर संजय राऊतांनी 'आता मी पुन्हा लढेन', अशी प्रतिक्रिया दिली आहे. जामीन मंजुर झाल्याचं समजताच संजय राऊतांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यानंतर त्यांनी 'मी न्यायदेवतेचे आभार मानतो, न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता की मला न्याय मिळेल, आता मी पुन्हा लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुनावणीवेळी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत, मुलगी आणि त्यांचे भाऊ कोर्टात उपस्थित होते. त्यावेळी डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते.

'माझा मुलगा येतोय, आनंद आहे', संजय राऊतांच्या आईंची प्रतिक्रिया...

शिवसेना नेते संजय राऊतांना जामीन मिळाल्याची माहिती कळताच त्यांच्या 'मैत्री' या निवासस्थानी उपस्थितांनी एकच जल्लोष केला. यावेळी त्यांच्या मातोश्रींनी माध्यमांशी बोलताना 'माझा मुलगा येतोय, आनंद आहे', अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय आता ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिवसेनेकडून जोरदार सेलिब्रेशन केलं जाणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी संजय राऊतांच्या बंगल्यावर जोरदार तयारी केली जात असून डीजेही लावले जाणार आहेत.

पुढील बातम्या