मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackreay : व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका असं म्हणत राज ठाकरेंच्या मनसेचा महायुतीला पाठिंबा

Raj Thackreay : व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका असं म्हणत राज ठाकरेंच्या मनसेचा महायुतीला पाठिंबा

Apr 09, 2024, 08:53 PM IST

  • Raj Thackeray : गुढीपाडाव्याच्या मेळाव्यात आपण लोकसभेसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून केली आहे. 

राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा

Raj Thackeray : गुढीपाडाव्याच्या मेळाव्यात आपण लोकसभेसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून केली आहे.

  • Raj Thackeray : गुढीपाडाव्याच्या मेळाव्यात आपण लोकसभेसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून केली आहे. 

Mns gudi padwa melava 2024  : दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतर मनसे महायुतीत सामील होत असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपणा महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरेंनी (raj thackeray)  गुढीपाडवा मेळाव्यातून केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा (Raj thackeray support to mahayuti for lok sabha election) जाहीर केला असून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

राज ठाकरे म्हणाले की, मला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी ठणकावून सांगितलं की, चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज होणार नाही. हे इंजिन चिन्ह कार्यकर्त्यांच्या कष्ठाने कमावलेलं आहे, त्यावरच लढणार.

मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज पार पडला. दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे युतीबाबत काय घोषणा करणार यांची उत्सूकता शिगेला पोहोचली होती. राज ठाकरेंनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते मनसे NDA मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आज अखेर राज ठाकरेंनी त्या सर्व चर्चांवर सविस्तर भाष्य केलं आहे. 

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे. राज ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांना तयारी करण्याचे आवाहनदेखील केले. राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. लोकसभा लढणार नसलो तरी विधानसभेच्या तयारीला लागा, असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, मला भूमिका पटल्या नाहीत तर मी त्यांच्यावर टीका करायलाही मागे रहात नाही. देशाला आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे. जर त्या पूर्ण झाल्या नाहीतर राज ठाकरे आहे. जर खंबीर नेतृत्व असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजप, शिवसेना युतीला नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. असं मी त्यांना सांगितलं आहे. 

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे मला भेटले होते. त्यांना मी सांगितले की, जागावाटपाच्या भानगडीत मला पाडू नका. १९९५ पासून मी कधी जागावाटपाच्या बैठकीत गेलो नाही. मला राज्यसभा किंवा विधानपरिषद नको आहे. देशाला पुढे नेण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच मी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत आहे. त्याचबरोबर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे अध्यक्षपद भूषवणार असल्याच्या चर्चांचे खंडन करताना म्हटले की, तसे असते तर यापूर्वीच झालो असतो.

 

पुढील बातम्या