Raj Thackeray Live : नरेंद्र मोदींसाठी मनसे महायुतीला पाठिंबा देतेय - राज ठाकरे
देशाला पुढची काही वर्षे खंबीर नेतृत्व हवं आहे. मला वाटाघाटीत पडायचं नाही. राज्यसभा वगैरे काही नको. केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी माझा पक्ष लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देईल - राज ठाकरे
Raj Thackeray Live : व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका; राज ठाकरे यांचं मतदारांना आवाहन
राज्यात सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. कोण, कोणत्या पक्षात आहे हेच कळत नाही. महाराष्ट्रातील मतदारांनी या व्यभिचाराला राजमान्यता देऊ नये, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांना केलं.
Raj Thackeray Speech Live : नरेंद्र मोदी यांच्याकडून माझी अपेक्षा आहे - राज ठाकरे
नरेंद्र मोदी यांच्याकडून माझी अपेक्षा आहे. भारतातील तरुणांकडं लक्ष द्या. हेच भविष्य आहे. सहा लाख उद्योजक देश सोडून गेले हे होता कामा नये. महाराष्ट्र जेवढा कर भरतो, तेवढा वाटा महाराष्ट्राला आला पाहिजे या माझ्या नरेंद्र मोदींकडून अपेक्षा आहेत - राज ठाकरे
Raj Thackeray Speech Live : मी नरेंद्र मोदींवर कधी वैयक्तिक टीका केली नाही - राज ठाकरे
Raj Thackeray Speech Live : नरेंद्र मोदींवर मी कधीही वैयक्तिक टीका केली नाही. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या भाषेत बोलतात, तसं मी कधीच बोललो नव्हतो. मी भूमिकेच्या विरोधात बोललो होतो. ह्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, सत्ता गेली म्हणून हे विरोध करतायत. मला काही तरी हवं होतं म्हणून मी मोदींवर कधी टीका केली नाही - राज ठाकरे
Raj Thackeray on Narendra Modi : ३७० कलम रद्द झाल्यानंतर कौतुक करणारं पहिलं ट्वीट माझं होतं - राज ठाकरे
नरेंद्र मोदी यांना टोकाचा विरोध करणारा मी होतो. ३७० कलम रद्द झाल्यानंतर पहिलं ट्वीट करणारा आणि कौतुक करणारा मी होतो. एनआरसीसाठी मी मोर्चा काढला होता - राज ठाकरे
Raj Thackeray on Narendra Modi : नरेंद्र मोदींना पाठिंबा देणारा मी पहिला व्यक्ती होतो - राज ठाकरे
Raj Thackeray on Narendra Modi : नरेंद्र मोदींना पाठिंबा देणारा मी पहिला व्यक्ती होतो. भाजपमधीलही कुणी बोललं नव्हतं. मोदींनी जी आश्वासनं दिली होती, ती २०१४ नंतर दिसली नाहीत म्हणून मी टीकाही केली. भविष्यात आमचं जमेल, न जमेल माहीत नाही. पण मला जे पटलं त्याचं कौतुक करतो. नाही पटलं तर त्यावर बोलणार. - राज ठाकरे
Raj Thackeray on BJP : भाजपशी माझे जुने संबंध आहेत. राजकारणापलीकडचे संबंध - राज ठाकरे
Raj Thackeray on BJP : शिवसेना भाजप युती असल्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांशी माझे संंबंध आहेत. राजकारणापलीकडचे संबंध आहेत. काँग्रेसशी कमी संबंध होते. भेटी व्हायच्या, पण गाठ भाजपशी बसली - राज ठाकरे
Raj Thackeray Speech Live : दिल्लीला भेटायला जाण्यात कमीपण कसला? - राज ठाकरे
दिल्लीला जाणारे राज ठाकरे हे पहिलेच ठाकरे अशाही बातम्या दिल्या गेल्या. बातम्या देणाऱ्यांना अनेक गोष्टी माहीत नसतात. १९८० साली बाळासाहेब स्वत: इंदिरा गांधी यांना भेटायला गेले होते. एखाद्या व्यक्तीला भेटण्यात कमीपणा कसला? माझ्याकडं अनेक लोक भेटायला येतात, त्यात त्यांचा कमीपणा काय? - राज ठाकरे
Raj Thackeray Speech Live : चिन्हावर तडजोड होणार नाही. मनसे इंजिनावरच निवडणूक लढणार - राज ठाकरे
आमच्या निशाणीवर लढा अशी ऑफर मला दिल्याची चर्चा होती. चिन्हावर तडजोड होणार नाही. जागावाटपाच्या चर्चेला मी १९९५ साली शेवटचा बसलो होतो - राज ठाकरे
Raj Thackeray on Shiv Sena : शिवसेनेचा प्रमुख व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो - राज ठाकरे
राज ठाकरे हे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार या केवळ बातम्या आहेत. व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो. मी फक्त बाळासाहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करेन असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळं असल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी फक्त स्वत: स्थापन केलेल्या पक्षाचाच प्रमुख राहणार राज ठाकरे
Raj Thackeray on political buzz : अमित शहा यांना भेटल्यानंतर नुसत्या वाट्टेल त्या बातम्या सुरू होत्या - राज ठाकरे
अमित शहा यांना भेटायला गेलो होतो. दिल्लीत त्यांना भेटलो. भेट दोघांचीच होती. मीडियाला काही माहीत नव्हतं तरी बातम्या सुरू. राज ठाकरे यांना १२ तास थांबायला लावलं. मुळात भेट दुसऱ्या दिवशी होती. आदल्या दिवशी मी तिथं पोहोचलो होतो. त्यात थांबण्याचा काय प्रश्न आहे - राज ठाकरे
Raj Thackeary Speech : डॉक्टर आणि नर्सेसना निवडणुकीचं काम कशासाठी? - राज ठाकरे यांचा सवाल
Raj Thackeray Speech Live : निवडणुका सुरू झाल्या की शिक्षक, डॉक्टर व परिचारिकांना वेगळं काम दिलं जातं. डॉक्टर काय मतदारांची नाडी तपासणार आहेत की नर्सेस डायपर बदलणार आहेत, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. डॉक्टर व परिचारिकांनी निवडणुकीच्या कामाला जाऊच नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
Raj Thackeray Speech Live : राज ठाकरे यांचं भाषण सुरू, हिंदूंना साद घालत भाषण सुरू
Raj Thackeray Speech Live : राज ठाकरे यांचं भाषण सुरू. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो… म्हणत भाषणाला सुरुवात
MNS Leader Bala Nandgaonkar : मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचं भाषण सुरू
मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांचं भाषण सुरू आहे. लपूनछपून विरोधक राज साहेबांचं भाषण ऐकत आहेत, असा टोला नांदगावकर यांनी हाणला.
MNS BJP Alliance : मनसे-भाजप युती होणार का?; राजकीय वर्तुळात उत्सुकता
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मनसे व भाजपच्या युतीची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळं या चर्चेला बळकटी मिळाली आहे. त्याशिवाय इतर काही तर्कवितर्कही लढवले जात आहेत. राज ठाकरे हे नेमका काय निर्णय घेणार याविषयी उत्सुकता आहे.
Raj Thackeray Speech : राज ठाकरे आपल्या भाषणात नेमकं काय बोलणार याविषयी उत्सुकता
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा हा मेळावा होत आहे. चालू लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका नेमकी काय असेल याबाबत राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार आहेत.
MNS Gudi Padwa Rally Live : मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर सुरू
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज होत आहे. थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार आहेत. राज ठाकरे काय बोलणार याविषयी उत्सुकता आहे.