मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : वारसा वास्तूचा नसतो विचारांचा असतो, राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला

Raj Thackeray : वारसा वास्तूचा नसतो विचारांचा असतो, राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला

Jan 23, 2023, 08:36 PM IST

    • Raj Thackeray Speech : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधीमंडळात त्यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी खास शैलीत उपस्थितांशी संवाद साधला.
Raj Thackeray Speech Live Today (HT)

Raj Thackeray Speech : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधीमंडळात त्यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी खास शैलीत उपस्थितांशी संवाद साधला.

    • Raj Thackeray Speech : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधीमंडळात त्यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी खास शैलीत उपस्थितांशी संवाद साधला.

Raj Thackeray Speech Live Today : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिंदे-फडणवीस सरकारनं विधीमंडळात बाळासाहेबाचं तैलचित्राचं अनावरण केलं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. तैलचित्राचं अनावरण केल्यानंतर राज ठाकरेंनी उपस्थितांशी संवाद साधताना बाळासाहेबांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगत त्यांच्या आठवणीला उजाळा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

विधीमंडळातील कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, वारसा हा वास्तुंचा नसतो तर विचारांचा असतो आणि बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा मी नेहमीच जपलेला आहे. बाळासाहेबांच्या सहवासाबद्दल बोलण्यास नेमकी कुठून सुरुवात करावी हे मला समजत नाहीये. मी जेव्हा शिशू वर्गात होतो त्यावेळी मला घेण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्वत: गाडी चालवत यायचे. घरातील एक जबाबदार व्यक्ती, शिवसेनाप्रमुख आणि व्यंगचित्रकार अशा अनेक रुपात मी बाळासाहेबांना पाहिलेलं आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला.

जवळपास तीन वर्षांनंतर मुंबईत होर्डिंग्सवर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट लागतंय. त्यासाठी मी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करतो, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र विधीमंडळात लावलं जातंय, याचा आनंद आहेच. परंतु विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात बाळासाहेबांची दोन तैलचित्र असायला हवीत, अशी विनंतीही राज ठाकरेंनी सरकारकडे केली आहे.

पुढील बातम्या