मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shinde Govt : थोरातांच्या काळात बदनाम झालेल्या महसूल खात्यात पारदर्शकता आणणार; विखे पाटलांचा टोला!

Shinde Govt : थोरातांच्या काळात बदनाम झालेल्या महसूल खात्यात पारदर्शकता आणणार; विखे पाटलांचा टोला!

Aug 15, 2022, 10:35 AM IST

    • Maharashtra Cabinet : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं असून त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल खातं देण्यात आलं आहे.
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat (HT)

Maharashtra Cabinet : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं असून त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल खातं देण्यात आलं आहे.

    • Maharashtra Cabinet : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं असून त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल खातं देण्यात आलं आहे.

Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat : शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटपही झालं आहे. त्यात मातब्बर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल खातं देण्यात आल्यानं अनेकांचा भुवया उंचावल्या आहे. याआधीच्या भाजप सरकारच्या काळात हे खातं चंद्रकांत पाटलांकडे होतं तर मविआ सरकारच्या काळात विखेंचे कट्टर विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरातांनी या खात्याचा कार्यभार संभाळला होता. परंतु आता महसूल खातं मिळताच राधाकृष्ण विखे पाटलांनी थोरातांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटलांना महसूल खातं मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या लोणीतील निवस्थानी जल्लोष केला असून विखे पाटलांनी भाजपच्या शीर्ष नेत्यांचं आभार मानलं आहे. महसूल खातं मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी मतदारसंघातील कोल्हारच्या देवीचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

थोरातांवर नाव न घेता टीका...

महसूल खातं मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना विखेंनी थोरातांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. महसूल खातं याआधी बदनाम झालेलं होतं, त्यामुळं हे खातं माझ्याकडे आल्यानंतर मी त्याचा अभ्यास करून या खात्यात पादर्शकता आणि लोकाभिमुखता आणणार असल्याचं सांगत विखेंनी माजी महसूलमंत्री थोरातांचा खोचक टोला लगावला आहे.

भाजपशी असलेली निष्ठा आणि काम करण्याची तयारी असली की संधी मिळतेच...

शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विखे पाटलांना महसूल खातं मिळाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षाशी निष्ठा आणि काम करण्याची तयारी असेल तर संधी मिळते, यामुळंच मला भाजपनं मोठी जबाबदारी दिली असून या संधीबद्दल मी पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो, असं विखे पाटलांनी सांगितलं आहे.

मागच्या काळात जे चुकीचं झालंय त्यावर कारवाई होणार-विखे

मागच्या मविआ सरकारच्या काळात काय झालं, याची चर्चा मला करायची नाही, लोकांना हे सरकार आपलं आहे, असं वाटायला हवं, मागच्या सरकारच्या काळात महसूल खात्यात काही चुकीचं घडलं असेल तर त्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही संकेत विखे पाटलांनी दिले आहे.

थोरात-विखे हे एकमेकांचे कट्टर विरोधक...

अहमदनगर जिल्ह्यात कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील एक कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. विखे पाटील हे कॉंग्रेसमध्ये असतानाही त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. याशिवाय राहाता-शिर्डी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघ एकमेकांच्या शेजारी असल्यानंही दोन्ही नेत्यांना विकासकामांवरून किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रस्सीखेच होत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळं आता याआधीच्या सरकारमध्ये थोरातांनी संभाळलेल्या महसूल खात्यात आता विखे पाटील कसा कारभार करतात, याकडं राज्याचं लक्ष असणार आहे.

पुढील बातम्या