मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sameer Wankhede NCB : नवाब मलिकांना मोठा धक्का; समीर वानखेडेंची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

Sameer Wankhede NCB : नवाब मलिकांना मोठा धक्का; समीर वानखेडेंची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

Aug 15, 2022, 09:22 AM IST

    • Sameer Wankhede : मुंबईच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंना क्लिनचीट दिली होती. आता त्यानंतर वानखेडेंनी मलिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
Sameer Wankhede Vs Nawab Malik (HT)

Sameer Wankhede : मुंबईच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंना क्लिनचीट दिली होती. आता त्यानंतर वानखेडेंनी मलिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

    • Sameer Wankhede : मुंबईच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंना क्लिनचीट दिली होती. आता त्यानंतर वानखेडेंनी मलिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Sameer Wankhede Vs Nawab Malik : मुंबई एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांना मुंबईच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं क्लिनचीट दिल्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या विरोधात गोरेगांव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. बनावट जात प्रमाणपत्र तयार करून सरकारी नोकरी लाटल्याचा आरोप मलिकांनी वानखेडेंवर केला होता. त्यानंतर आता जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं ते मुस्लिम नसून महार असल्याचं स्पष्ट करत त्यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं होतं. त्यामुळं आता समीर वानखेडेंनी नवाब मलिकांवर कारवाई करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

Pune Hoarding Collapse : मुंबईनंतर पिंपरी चिंचवड शहरातही होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

समीर वानखेडे-नवाब मलिक वाद काय?

समीर वानखेडे हे एनसीबीचे मुंबई झोनचे संचालक होते, त्यावेळी त्यांनी अंमली पदार्थाच्या तस्करीच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या जावयाला अटक केली होती. त्यानंतर आठ महिन्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची सुटका करण्यात आली, परंतु त्यानंतर नवाब मलिकांनी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी लाटल्याचा आरोप केला होता. त्यानंतर समीर वानखेडे आणि मलिक यांच्यात मोठा आरोप-प्रत्यारोप रंगला होता.

समीर वानखेडेंनी मलिकांविरोधात गोरेगाव पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार, नवाब मलिकांच्या जावयाला आणि आर्यन खानला अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक केल्यानंतर नवाब मलिकांनी सातत्यानं त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं म्हटलं आहे. याशिवाय मलिकांवी पत्नी, वडिल आणि कुटुंबियांवर सातत्यानं बेछूट आरोप केले, शबाना कुरैशी यांच्याशी लग्न होण्यापूर्वी मी केंद्र शासनाच्या नोकरीत रुजू झालो होतो, मी किंवा माझ्या वडिलांनी कोणत्याही प्रकारचं धर्मांतर केलेलं नसून अनुसूचित जातीचा सदस्य असल्यामुळंच नवाब मलिक यांनी बदनामी केल्याचं वानखेडेंनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

<p><strong>Sameer Wankhede Vs Nawab Malik</strong></p>

त्यामुळं आता गोरेगांव पोलिसांनी समीर वानखेडेंनी दिलेल्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल केला आहे. सध्या नवाब मलिक हे मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणात तुरुंगात असून आता त्यांच्याविरोधात समीर वानखेडेंनी एफआयआर दाखल केल्यानं त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या