मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अग्नितांडव, केमिकलची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अग्नितांडव, केमिकलची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग

Aug 04, 2023, 06:46 AM IST

    • Samruddhi Mahamarg Buldhana : केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याची माहिती आहे.
samruddhi mahamarg accident news today (HT)

Samruddhi Mahamarg Buldhana : केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याची माहिती आहे.

    • Samruddhi Mahamarg Buldhana : केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याची माहिती आहे.

Buldhana Truck Accident On Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग लागताच चालकाने खाली उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. परंतु ट्रक जळून खाक झाला आहे. परिणामी समृद्धी महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नजीक ही घटना घडली आहे. ट्रकला आग लागण्याच्या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं आहे. त्यामुळं आता समृद्धी महामार्गावरील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून नागपुरच्या दिशेने केमिकलची वाहतूक करत असलेल्या भरधाव ट्रकला मध्यरात्री अचानक आग लागली. बुलढाण्याजवळील मेहकर नजीक ही घटना घडली असून आग लागल्याची घटना समजताच चालकाने खाली उडी मारली. त्यामुळं ड्रायव्हरचा जीव वाचला असून ट्रक आगीत जळून भस्मसात झाला आहे. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नसली तरी ट्रकमधील संपूर्ण केमिकल जळून खाक झालं आहे. त्यामुळं महामार्गावर ट्रक जळून खाक झाल्याने कॉरिडॉरवरील वाहतूक काही काळ थांबवावं लागलं. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर सातत्याने भीषण अपघात होत असल्याच्या घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यात खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याने २६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा ट्रकला भीषण आग लागल्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. त्यामुळं आता समृद्धी महामार्गावरील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. ट्रक अपघाताच्या घटनेनंतर समृद्धी महामार्गावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

पुढील बातम्या