Live News Updates 04 August 2023 : सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 04 August 2023 : सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल
Live News Updates 04 August 2023
Live News Updates 04 August 2023(HT)

Live News Updates 04 August 2023 : सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल

Updated Aug 04, 2023 07:31 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

Supreme Court on Rahul Gandhi: सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. सूरज कोर्टाकडून राहुल गांधी यांना ठोठावण्यात आलेली शिक्षेवर स्थगिती देण्यात आली आहे.

Fri, 04 Aug 202302:01 PM IST

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे खालापूर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईसीएल फायनान्स कंपनी व एडलवाईस ग्रुपचे पदाधिकारी अशा एकूण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Fri, 04 Aug 202308:37 AM IST

 कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर आज अंत्यसंस्कार

हिंदी चित्रपटांचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील एनडी स्टुडिओच्या आवारात आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. देसाई यांनी बुधवारी आत्महत्या केली होती.

Fri, 04 Aug 202308:26 AM IST

 सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा बहाल

सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे.

Fri, 04 Aug 202307:12 AM IST

जोशी बेडेकर कॉलेज मारहाण प्रकरणः दोषींवर कारवाईची मागणी

ठाणे शहरातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये NCC विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान बेदम मारहाण करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्याला त्वरित अटक करून शिक्षकांवर कारवाई करावी या मागणीसाठी युवासेना-ठाकरे गटाकडून कॉलेजसमोर निदर्शने करण्यात आले.

Fri, 04 Aug 202305:46 AM IST

Nitin Desai Funeral: नितीन देसाईंवर आज होणार अंत्यसंस्कार

Nitin Desai Funeral Update: बॉलिवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे बुधवारी निधन झाले. त्यांनी गळफास लावून आपली जीवनकहाणी संपवली. नितीन देसाई यांच्या जाण्याने सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे. आज (४ ऑगस्ट) सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जेजे हॉस्पिटल गाठून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी दुपारी १२ ते २ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनडी स्टुडिओ येथे ठेवण्यात येणार आहे.

Fri, 04 Aug 202304:35 AM IST

Share Market Update : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार सकारात्मक

Sensex Nifty update : मागील दोन दिवसांपासून घसरत असलेला शेअर बाजार आज, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सावरलेला दिसत आहे. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी वधारला असून निफ्टी देखील ७० अंकांनी वाढून ट्रेड करत आहे.

Fri, 04 Aug 202303:22 AM IST

Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस; सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी होणार?

Maharashtra Assembly Monsoon Session : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळं शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था आणि महिलांच्या प्रश्नावर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अखेरच्या दिवशी सरकारकडून निवेदन देणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Fri, 04 Aug 202302:08 AM IST

BEST Strike : बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, बससेवा विस्कळीत झाल्याने मुंबईकरांना मनस्ताप

BEST Mumbai Strike : बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी संप पुकारला आहे. परिणामी शहरातील अनेक ठिकाणी सार्वजनिक बससेवा विस्कळीत झाल्याने त्याचा फटका मुंबईकरांना बसत आहे.

Fri, 04 Aug 202312:51 AM IST

Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला सांगलीतून कडाडून विरोध, पोलिसांनीही परवानगी नाकारली

Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यातच विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिराळा तालुक्यातील कोकरुड गावात नागरिकांनी संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. याशिवाय पोलिसांनीही संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला पोलिसांनीही परवानगी नाकारल्याची माहिती आहे.

Fri, 04 Aug 202312:50 AM IST

Pune Crime : बॅनरवर फोटो न लावल्याने आरोपीचा जीवघेणा हल्ला

Pune Crime : बॅनरवर फोटो न लावल्याच्या कारणावरून आरोपीने मित्रावरच जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कोथरुड परिसरात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Fri, 04 Aug 202312:49 AM IST

Amit Shah Pune Visit : गृहमंत्री अमित शहा रविवारी पुणे दौऱ्यावर

Amit Shah Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या रविवारी म्हणजेच सहा ऑगस्टला अमित शहा पुण्यात येणार असून एका सहकारी मल्टिस्टेटच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे.