मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक, जालन्यात एसटी महामंडळाची बस पेटवली

Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक, जालन्यात एसटी महामंडळाची बस पेटवली

Feb 26, 2024, 10:14 AM IST

  • Maratha Protesters Set Fire MSRTC Bus in Jalna: मराठा आंदोलकांनी जालन्यातील अंबड तालुक्यात एसटी महामंडळाची बस पेटवूट दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

Jalna News

Maratha Protesters Set Fire MSRTC Bus in Jalna: मराठा आंदोलकांनी जालन्यातील अंबड तालुक्यात एसटी महामंडळाची बस पेटवूट दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Maratha Protesters Set Fire MSRTC Bus in Jalna: मराठा आंदोलकांनी जालन्यातील अंबड तालुक्यात एसटी महामंडळाची बस पेटवूट दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

Maratha Reservation: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. जालनाच्या (Jalna) अंबड तालुक्यातील (Ambad taluka) तीर्थपुरी शहर (Tirthpuri city) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) मराठा आंदोलकांनी एसटी महामंडळाची बस पेटवून दिली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

 

अंबड तालुक्यात संचारबंदी लागू

अंबड तालुक्यातील वाढता तणाव पाहता पोलिसांनी परिसरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. या काळात दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत. 

Manoj Jarange :भांबेरीत मोठा बंदोबस्त! मराठा आंदोलकांची धरपकड; ७ जणांना घेतले ताब्यात

एसटी महामंडळाची जालन्यात वाहतूक बंद

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुढील सूचना मिळेपर्यंत जालन्यातील बस फेऱ्या बंद केल्या आहेत. मराठा आंदोलकांनी बस जाळल्याचा आरोप केल्यानंतर एसपी जालना यांच्या सूचनेवरून हे पाऊल उचलण्यात आले आहे: एमएसआरटीसी

Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील उपचार घेण्यास तयार! अंतरवाली सराटी येथे रवाना, पुढची दिशा ठरवणार

एसटी महामंडळाची पोलीसांत तक्रार

मराठा आंदोलकांनी बस जाळल्याचा आरोप केल्यानंतर एसटी महामंडळाच्या अंबड आगार व्यवस्थापकाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने एसटी महामंडाळाच्या हवाल्याने दिली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या