Manoj Jarange :भांबेरीत मोठा बंदोबस्त! मराठा आंदोलकांची धरपकड; ७ जणांना घेतले ताब्यात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange :भांबेरीत मोठा बंदोबस्त! मराठा आंदोलकांची धरपकड; ७ जणांना घेतले ताब्यात

Manoj Jarange :भांबेरीत मोठा बंदोबस्त! मराठा आंदोलकांची धरपकड; ७ जणांना घेतले ताब्यात

Feb 26, 2024 07:58 AM IST

Manoj Jarange protest : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला असून ते आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यासमोर उपोषण करणार आहेत. दरम्यान, काल ते भांबेरी येथे थांबले असून पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

manoj jarange patil
manoj jarange patil

Manoj Jarange protest : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. एवढेच नाही तर ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यापुढे उपोषणाला बसणार आहे. त्यांच्या उपोषणाचा आज १६ वा दिवस असून रविवारी रात्री ते मुंबईसाठी रवाना झाले आहे. जरांगे पाटील रविवारी रात्री मुक्कामी भांबेरी येथे थांबले आहेत. आज ते मुंबईला जाणार आहेत.  या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. पोलिसांनी कांही आंदोलकांची धरपकड सुरू केली असून ७ जणांना ताब्यात घेतले असल्याचे समजते. जरांगेच्या दोन शिलेदारांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जरांगे आज काय भूमिका घेणार या कडे लक्ष लागून आहे.

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात आज 'ऑरेंज अलर्ट', 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. देवेंद्र फडणवी यांनी मराठा आरक्षनाविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. जरांगे पाटील म्हणाले, ‘तुझा बाम्हणी कावा मी आता हाणून पाडतो आणि सगे सोयरेची अमंलबजावणी घेतल्याशिवाय राहत नाही. मला सलाईनद्वारे विष देवून मारण्याचा यांचा डाव आहे. त्यामुळं इथे उपोषण करत मरण्यापेक्षा मीच तिथे येतो, घाला मला गोळ्या’. अशी आक्रमक भूमिका घेतल्यावर रविवारी रात्री मनोज जरांगे पाटील मुंबईला रवाना झाले आहे.

pimpri-chinchwad Crime : आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या; पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथील घटना

मनोज जरांगे पाटील काल रात्री, भांबेरी येथे पोहचले आहे. आज हजारो मराठा आंदोलकांसह दुपारी १२ वाजता ते मुंबईला धडकणार आहेत. जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी जालना आणि छत्रपती संभाजीनगर सीमा भागात बॅरिकेट लावण्याची तयारी केली आहे. मनोज जरांगे हे पैठण-बीडकिन-गंगापूर-वैजापूर-येवला-नाशिक-ठाणे या मार्गावरून जाणार आहेत. या पूर्वीच त्यांच्या काही सहकाऱ्यांची देखील धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. आता पर्यन्त ७ ते ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जरांगे पाटील यांचे दोन जवळचे शिलेदार शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे यांना आज पहाटे ४ वाजता ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परशभूमीवर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्यात बैठक झाली असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती यावेळी घेण्यात आली. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करण्यावर देखील चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील आज भांबेरी गावातून मुंबईकडे रवाना होणार आहेत. यामुळे येथे पोलिस बांदोबस्तासह दंगल नियंत्रक पथक तैनात करण्यात आले आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर