मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील उपचार घेण्यास तयार! अंतरवाली सराटी येथे रवाना, पुढची दिशा ठरवणार

Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील उपचार घेण्यास तयार! अंतरवाली सराटी येथे रवाना, पुढची दिशा ठरवणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 26, 2024 09:31 AM IST

Manoj jarange patil : मनोज जरांगे पाटील भांबेरी येथून अंतरवाली सराटी येथे पुन्हा परत जाणार आहे. या ठिकाणी ते उपचार घेणार असून यानंतर ते आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे.

Manoj Jarange Patil calls for Protest
Manoj Jarange Patil calls for Protest (ANI)

Manoj jarange patil : : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, काल ते भांबेरी येथे थांबले होते. पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तर जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी संचार बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उपचार घेण्यासाठी देखील ते तयार झाले आहेत. गावी पोचल्यावर सलाईन लावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अंतरवली सराटी येथे बैठक घेतल्यावर मुंबईला जाण्याची पुढची दिशा ते ठवणार आहेत. सध्या ते भांबोरी गावातून परत अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहे.

Ajit Pawar letter : मी वेगळा निर्णय का घेतला? जनतेला खुलं पत्र लिहित अजित पवारांनी भूमिका केली स्पष्ट

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यासमोर उपोषण करणार आहेत. दरम्यान, रविवारी रात्री ते मुंबईसाठी रवाना झाले होते. त्यांनी रात्री मुक्कामी भांबेरी येथे मुक्काम घेतला होता. दरम्यान, सोमवारी जालना, सांभाजीनगर येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून संचार बंदी देखील लागू केली आहे. आज सकाळी भांबेरी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अंतरवाली सराटी येथे परत जाणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी जाऊन ते उपचार घेणार आहेत. ते सलाईन लावणार आहेत. तसेच दुपारी ते कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून या यानंतर मुंबईला जाण्याबाबत त्यांची दिशा ठरवणार आहेत. जरांगे म्हणाले, पोलिसांनी ठीक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला असून संचारबंदी लागू केली आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. त्यामुळे मुंबईत कधी आणि किती जणांनसोबत जायचे याचा निर्णय अंतरवली सराटी येथे जाऊन घेणार आहे. यामुळे माघारी जात आहे. दरम्यान, आंदोलकांनी शांत राहावे आणि पोलिसांना सहकार्य करावे असे देखील जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange :भांबेरीत मोठा बंदोबस्त! मराठा आंदोलकांची धरपकड; ७ जणांना घेतले ताब्यात

देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा टीका

भांबेरी येथे पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचावर टीका केली आहे. देवेंद्र फडणीस ही दुटप्पी आहेत. त्यांनीच आम्हाला सागर बंगल्यावर येऊन चर्चा करा असे सांगितले होते. आता आम्ही जेव्हा चर्चेसाठी जायला निघालो आहोत तर त्यांनी त्यांच्या बंगल्याची दारे बंद केली आहेत. मराठा आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सज्ज होणार आहोत.

सागर बंगल्यावर चोख सुरक्षा व्यवस्था

मनोज जरांगे पाटील हे सागर बंगल्यावर उपोषण करणार आहेत. या साठी ते मुंबईला रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी दंगल विरोधी पथके देखील तैनात करण्यात आले आहेत. काल रात्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली असून जरांगे यांच्या बाबत काय भूमिका घ्यावी यावर चर्चा झाल्याचे समजते.

IPL_Entry_Point