मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदे परत चला, साताऱ्यातले शिवसैनिक गुवाहाटीत, पोलिसांनी घेतलं ताब्यात

एकनाथ शिंदे परत चला, साताऱ्यातले शिवसैनिक गुवाहाटीत, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Jun 24, 2022, 11:02 AM IST

    • एकनाथ शिंदे मातोश्रीवर परत चला असा बोर्ड हातात घेऊन साताऱ्यातील शिवसैनिक थेट गुवाहाटीत हॉटेलबाहेर पोहोचले आहेत.
संजय भोसले, सातारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

एकनाथ शिंदे मातोश्रीवर परत चला असा बोर्ड हातात घेऊन साताऱ्यातील शिवसैनिक थेट गुवाहाटीत हॉटेलबाहेर पोहोचले आहेत.

    • एकनाथ शिंदे मातोश्रीवर परत चला असा बोर्ड हातात घेऊन साताऱ्यातील शिवसैनिक थेट गुवाहाटीत हॉटेलबाहेर पोहोचले आहेत.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बंड पुकारल्यानंतर सुरतमधून गुवाहाटीत (Guwahati) गेले आहेत. त्यांच्यासोबत आमदारही आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते गुवाहाटीत थांबले आहेत. तर काही आमदार अजुनही गुवाहाटीला जात आहेत. दरम्यान, साताऱ्यातून (Satara) काही शिवसैनिक आणि पदाधिकारी थेट गुवाहाटीत एकनाथ शिंदे राहत असलेल्या हॉटेलबाहेर पोहोचले आहेत. यातील संजय भोसले (sanjay Bhosale) या साताऱ्यातील शिवसेना उपजिल्हाप्रमुखाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या होता. एकनाथ शिंदे भाई मातोश्रीवर परत चला असे बोर्डही त्यांनी हातात घेतले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

एकनाथ शिंदे  आणि इतर आमदार राहत असलेल्या हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आहे. हॉटेल रॅडिसनबाहेर साताऱ्यातील काही शिवसैनिक पोहोचले होते. त्यांना पोलसिांनी ताब्यात घेतलं होतं. सुरतहून आणखी काही आमदार येत असल्याची माहिती समजते.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले संजय भोसले यांनी म्हटलं की, "आम्ही उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची साथ द्यावी, शिवसेनेसोबत रहावं. बाळासाहेबांचे शब्द खरे करावेत हेच आमचं आवाहन आहे."

“मी शिवसैनिक, शिवसेनेसाठी कुठेही जायला तयार आहे. पोलिस मला कुठे घेऊन चाललेत मला माहिती नाही." असं संजय भोसले म्हणाले. पोलिसांनी संजय भोसले यांना हॉटेल रॅडिसनबाहेर ताब्यात घेतलं. "हा संवेदनशील परिसर असल्यानं कायद्यानुसार ही कारवाई केली असल्याचं” पोलिसांनी म्हटलं आहे.

सध्या हॉटेल रॅडिसनमध्ये मंत्री एकनाथ शिंदे आणि काही आमदार त्यांच्या वकिलांसोबत चर्चा करत आहेत. सात ते आठ वकिलांची टीम असून पुढची रणनिती कशी आखायची यावर खलबतं सुरू आहेत. यानंतर सर्व आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे. 

पुढील बातम्या