मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Political Crisis Live: शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात बैठक सुरू
Uddhav Thackeray - Sharad Pawar

Maharashtra Political Crisis Live: शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात बैठक सुरू

Jun 24, 2022, 07:09 PMIST

Shiv Sena Revolt Live update: शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटाला ४१ आमदारांचं पाठबळ असून आता ते आपल्या गटाला अधिकृत गट म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. जाणून घेऊन क्षणोक्षणीच्या घडामोडी…

Jun 24, 2022, 06:35 PMIST

Sharad Pawar at Matoshree: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल व जयंत पाटील हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Jun 24, 2022, 06:14 PMIST

Yamini Jadhav: एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केला बंडखोर आमदार यामिनी जाधव यांचा व्हिडिओ

संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही याचं मनात शल्य आहे. आम्ही सर्व शिवसेनेतच, पण हा निर्णय घेण्याची वेळ का आली हे सर्वांनी समजून घ्यावं, असं यामिनी जाधव यांनी म्हटलं आहे.

Jun 24, 2022, 06:09 PMIST

Ajit Pawar to Meet Uddhav Thackeray: उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना

राज्यातील राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष कामाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री' निवासस्थानी पोहोचले आहेत.

Jun 24, 2022, 06:08 PMIST

Maharashtra Political Crisis Live: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील व अजित पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील व अजित पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. खुद्द अजित पवार यांनीच ही माहिती दिली. पुढील वाटचाल कशी करायची यावर या बैठकीत चर्चा होईल, असं अजित पवार म्हणाले.

Jun 24, 2022, 06:08 PMIST

Ajit Pawar on Shiv Sena Revolt: गुवाहाटीत असलेले आमदार शिवसेनेचेच. त्यामुळं सरकारला अडचण नाही - अजित पवार

गेलेले लोक सांगतात की आम्ही शिवसेनेचेच आहोत. तसं असेल तर काहीच अडचण नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत - अजित पवार

Jun 24, 2022, 06:08 PMIST

Uddhav Thackeray: शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांचं जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन

मेलो तरी शिवसेना सोडणार नाही असं म्हणणारे सोडून गेले. पण मी जिद्दी आहे, जिद्द कायम आहे. मला सत्तेचा लोभ नाही. 'वर्षा' बंगला सोडून आलोय. मी बरा होऊ नये म्हणून काही जण पाण्यात देव ठेवून बसले होते. मला वाटतं होतं खुर्ची हलतेय, पण ते मानेचं दुखणं होतं - उद्धव ठाकरे

Jun 24, 2022, 06:08 PMIST

Shiv Sena Revolt Live: एकनाथ शिंदे गटाला धक्का; विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी अजय चौधरी यांच्या नियुक्तीला मान्यता

एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी करण्यात आलेली अजय चौधरी यांची नियुक्ती विधिमंडळ सचिवांनी मान्य केली आहे. तसं पत्र शिवसेनेला पाठवण्यात आलं आहे.

Jun 24, 2022, 01:13 PMIST

Eknath Shinde Vs Shiv Sena Live: एकनाथ शिंदे गुवाहाटीच्या हॉटेलातून बाहेर पडल्याची माहिती

गेल्या दोन दिवसांपासून गुवाहाटी येथील हॉटेलात ठाण मांडून बसलेले शिवसेनेचे बंडखोर नेते तिथून बाहेर पडल्याची सूत्रांची माहिती आहे. ते तिथून नेमके कुठे गेले आहेत याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Jun 24, 2022, 01:13 PMIST

Sanjay Raut: महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार - संजय राऊत

आम्ही हार मानणार नाही. आम्हीच जिंकणार. रस्त्यावरची लढाई देखील आम्हीच जिंकू आणि विधानसभेतही आम्हीच जिंकू. महाविकास आघाडी सरकार आणखी अडीच वर्षे टिकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.  

Jun 24, 2022, 12:03 PMIST

Mangesh Kudalkar: बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर. आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पोस्टरला फासले काळे

मुंबईतील कुर्ला, नेहरूनगर भागात शिवसैनिक आमदार मंगेश कुडाळकर याच्या विरोधात आक्रमक. पोस्टरला फासले डांबर

Jun 24, 2022, 12:03 PMIST

Raju Shetti: आज शिवसेनेवर वेळ आलीय, उद्या भाजपवरही हीच वेळ येईल - राजू शेट्टी

एका पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात जातात हे अत्यंत अयोग्य आहे. आज शिवसेनेवर ही वेळ आलीय, उद्या भाजपवरही येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Jun 24, 2022, 12:02 PMIST

Dilip Walse Patil: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पोहोचले

 शरद पवार व संजय राऊत यांच्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक सुरू असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील तिथं पोहोचले आहेत.

Jun 24, 2022, 11:11 AMIST

Sharad Pawar-Sanjay Raut Meeting: शरद पवार व संजय राऊत यांच्या महत्त्वाची बैठक.

राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना नेते संजय राऊत यांच्या महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीसाठी संजय राऊत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पोहोचले आहेत.

Jun 24, 2022, 10:42 AMIST

Chandrakant Patil: एकनाथ शिंदे यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव नाही - चंद्रकांत पाटील

एकनाथ शिंदे यांच्याकडून अद्याप सरकार स्थापनेसाठी कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यास आमची कोअर कमिटी त्यावर निर्णय घेईल. नंतर तो प्रस्ताव केंद्राकडं पाठवला जाईल. पण सध्या तरी यातलं काहीच झालेलं नाही - चंंद्रकांत पाटील

Jun 24, 2022, 10:39 AMIST

Shiv Sena Revolt Live: साताऱ्यातील शिवसैनिक पोहोचले गुवाहाटीत; बंडखोरांना केलं आवाहन

साताऱ्यातील काही शिवसैनिक गुवाहाटीत गेले आहेत. त्यांनी आम्ही उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक असल्याचं म्हटलंय. त्यातील संजय भोसले या शिवसैनिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंडखोर आमदारांनी शिवसेनेची साथ द्यावी, शिवसेनेसोबत राहावं, बाळासाहेबांचे शब्द खरे करावेत, असं आवाहन हे शिवसैनिक करत आहेत.

Jun 24, 2022, 09:26 AMIST

Maharashtra Political Crisis: शिंदेंच्या बंडामागे भाजपचाच हात असल्याचं सांगणारा व्हिडीओ व्हायरल

एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांसोबत बोलत असलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एकनाथ शिंदे आपल्यासोबत महाशक्ती असल्याचं सांगतात. तसंच तो एक राष्ट्रीय पक्ष असून त्यांनी पाकिस्तानात काय केलं माहिती आहे असंही ते म्हणतात. 

Jun 24, 2022, 09:26 AMIST

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जिल्हाप्रमुखांना मुंबईत बोलावण्यात आलं आहे. यांच्यासोबतच्या बैठकीत उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुखांना ऑनलाइन उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

Jun 24, 2022, 09:26 AMIST

Maharashtra Political Crisis: मोदी आणि शहा यांची बैठक, देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची काल अडीच तास बैठक झाली. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेसुद्धा दिल्लीत आहेत.

Jun 24, 2022, 09:26 AMIST

Maharashtra Political Crisis: सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र  राज्यपालांना देण्याची शक्यता

एकनाथ शिंदे यांचा गट महाविकास आघाडीतू बाहेर पडण्यासाठी हालचाली करत असल्याची माहिती समजते. सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र शिंदे गटाकडून राज्यपालांना दिले जाण्याची शक्यता आहे. पाठिंबा काढल्यानंतर पुढच्या प्रक्रियेसाठी शिंदे गटाने तयारी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Jun 24, 2022, 09:25 AMIST

Maharashtra Political Crisis: आणखी दोन आमदार पोहोचले गुवाहाटीत

गुवाहाटीत आणखी दोन आमदार पोहोचले असून यामध्ये अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि गीता जैन यांचा समावेश आहे.

    शेअर करा