मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लोकांना काही कमी पडू देऊ नका; मुख्यमंत्री आणि बंडखोर आमदाराचे कॉल रेकॉर्ड VIRAL

लोकांना काही कमी पडू देऊ नका; मुख्यमंत्री आणि बंडखोर आमदाराचे कॉल रेकॉर्ड VIRAL

Jun 28, 2022, 10:15 AM IST

    • काही असल्यास सांगत चला आणि लोकांना काही कमी पडू देऊ नका असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये म्हणतात.
मुख्यमंत्र्यांचे बंडखोर आमदारासोबतचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

काही असल्यास सांगत चला आणि लोकांना काही कमी पडू देऊ नका असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये म्हणतात.

    • काही असल्यास सांगत चला आणि लोकांना काही कमी पडू देऊ नका असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये म्हणतात.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीत (Guwahati) असलेले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांना वेळ मिळत नाही. पत्र दिले तर त्याला उत्तर देत नाहीत अशी तक्रार केली होती. शिवसेनेच्या आमदारांमध्ये अंतर्गत खदखद असून मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. आता संजय गायकवाड आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. पुणे महिला विदर्भ संपर्क प्रमुख शिल्पा बोडखे यांनी हा ऑडिओ शेअर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

उद्धव ठाकरे संजय गायकवाड यांच्या मतदारसंघातील कोरोनाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या स्थितीबाबतची माहिती विचारली आहे. मातोश्रीवरून करण्यात आलेल्या या कॉलमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचारपूस करतात. कोरोनाची परिस्थिती कशी काय असा प्रश्न मुख्यमंत्री विचारतात. तसंच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूवरही काळजीही व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत का याचीही विचारणा मुख्यमंत्र्यांनी यामध्ये केल्याचं ऐकायला मिळते.

काही असल्यास सांगत चला आणि लोकांना काही कमी पडू देऊ नका असंही मुख्यमंत्री यामध्ये म्हणतात. यावर संजय गायकवाड म्हणतात की, "ज्या माणसाने पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सांभाळली तो इतकं चांगलं काम करतोय याचं लोकं आश्चर्य करतायत." तेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की, "तुम्ही आहात ना, मी थोडीच काय करतोय."

राज्यातील बंडखोरीचं हे नाट्य सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं आहे. काल सुप्रीम कोर्टात बंडखोर आमदारांवरील कारवाईसंदर्भात सुनावणी झाली. यात बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला असून पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांसह ४८ आमदार आहेत. आता त्यांचा गुवाहाटीतील मुक्काम वाढला आहे.

पुढील बातम्या