मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dagdusheth Ganpati Mandir : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा

Dagdusheth Ganpati Mandir : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा

May 19, 2023, 08:03 PM IST

    • Dagdusheth Halwai Ganpati Mandir : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Dagdusheth Halwai Ganpati temple in Pune (HT)

Dagdusheth Halwai Ganpati Mandir : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

    • Dagdusheth Halwai Ganpati Mandir : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Dagdusheth Halwai Ganpati temple in Pune : पुण्यातील गणपती भाविकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. त्यामुळं आता पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सी दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. चिंचवडच्या मोरया गोसावी देवस्थानच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचंही आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

महाराष्ट्रासह देशभरातील गणेशभक्तांसाठी पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर हे श्रद्धास्थान आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भारतासह जगभरातील गणपती भक्त येत असतात. त्यामुळं या सर्व बाबींचा विचार करून दगडूशेठ गणपती मंदिराला सी दर्जाचं पर्यटनस्थळ असल्याचा दर्जा देण्यात आला आहे. गड किल्ले तसेच मंदिरांचं संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारकडून तब्बल ४२ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर आणि वाफगावच्या होळकर वाडा वास्तूंचं राज्य सरकारकडून संवर्धन करण्यात येणार आहे.

पुण्यातील महापालिकेच्या शाळांमध्ये प्रयोगशाळांसाठी ४.५० कोटी, बालेवाडीतील क्रीडा विद्यापीठाच्या विकासासाठी १६ कोटी आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ३.१० कोटी रुपयांची तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. तसेच पुणे महापालिकेत नव्याने सामील झालेल्या २३ गावांचा डीपीसीमार्फत विकास केला जाणार असल्याचंही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांना अद्ययावत वाहनांच्या खरेदीसाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पुढील बातम्या