मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldana Bus Tragedy: बुलढाणा बस दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट, म्हणाले...

Buldana Bus Tragedy: बुलढाणा बस दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट, म्हणाले...

Jul 01, 2023, 11:35 AM IST

  • Devendra Fadnavis On Buldana Bus Tragedy: बुलढाणा बस दुर्घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फसणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis On Buldana Bus Fire

Devendra Fadnavis On Buldana Bus Tragedy: बुलढाणा बस दुर्घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फसणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

  • Devendra Fadnavis On Buldana Bus Tragedy: बुलढाणा बस दुर्घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फसणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

Buldana Bus Fire: बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गावर बसला आग लागल्याने २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणाच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

बुलढाणा बस दुर्घटनेसंदर्भात ट्वीट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.”

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली."

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या