Buldana Accident News: बुलढाण्यातील मलकापूर शहरातील बायपासवर आयशर ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतवरून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचे मलकापूर बायपासवर टायर पंक्चर झाले. पंक्चर दुरुस्त करण्यासाठी ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या एका बाजूला उभी करण्यात आली. मात्र, त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या आशयरने या बसला धडक दिली. या धडकेत आयशरचा चालक आणि क्लिनर जागीच ठार झाले. तर, ट्रॅव्हल्स बसचा चालक आणि त्याच्या बाजूला बसलेली गर्भवती महिलेच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. जखमी महिलेला तात्काळ मलकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या महिलेची प्रकृती खालवल्याने तिला बुलढाणा येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान, तिचा मृत्यू झाला. या अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे.
अंजली जाधव असे मृत्यू झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे.अंजलीचे पतीशी भांडण झाले होते. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून अंजली आपल्या आई-वडिलांसोबत सूरत येथे राहत होती. अंजलीला आता नववा महिना लागल्याने तिचे आई-वडिल तिला घेऊन त्यांच्या मूळगावी बडनेरा येथे प्रसुतीसाठी घेऊन चालले होते. मात्र, रस्त्यातच अपघात झाल्याने अंजलीचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या