मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : कंगना रणौत तुमची भेट घेणार आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..

Eknath Shinde : कंगना रणौत तुमची भेट घेणार आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..

Oct 01, 2022, 07:40 PM IST

    • कंगना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे एकनाथ शिंदे यांनी कंगना रणौत यांच्या भेटीच्या चर्चावर भाष्य केलं आहे.
कंगना व मुख्यमंत्री शिंदे

कंगना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे एकनाथ शिंदे यांनी कंगना रणौत यांच्या भेटीच्या चर्चावर भाष्य केलं आहे.

    • कंगना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे एकनाथ शिंदे यांनी कंगना रणौत यांच्या भेटीच्या चर्चावर भाष्य केलं आहे.

मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या वेळी कंगना रणौतने सरकारवर सडकून टीका केली होती. कंगना व शिवसेनेमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath shinde) मुख्यमंत्री झाले व कंगनाचा संघर्ष कौतुकात बदलला. रिक्षाचालक ते मुख्यमंत्रीपदाच्या प्रवासावर कंगनाने (Kangana ranaut) शिंदेंचे कौतुक केले होते. आता कंगना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे एकनाथ शिंदे यांनी कंगना रणौत यांच्या भेटीच्या चर्चावर भाष्य केलं आहे. कंगना आपली भेट घेणार आहे असं सांगण्यात आलं असता ते म्हणाले मुख्यमंत्री या नात्याने मला अनेकजण भेटत असतात. पण कंगनाच्या भेटीबद्दल अद्याप तरी आपल्याया माहिती नाही. मी काही लपवून ठेवत नाही. आपला सगळा कारभार पारदर्शक आहे. पोटात एक,ओठात एक असं नसतं.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Hoarding Collapse: मुंबईनंतर पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंग कोसळलं, गाड्यांचे मोठे नुकसान

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Mumbai Pune weather update : मुंबईत उकाड्याने तर, ऊन आणि पावसाच्या खेळानं पुणेकर हैराण

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

एकनाथ शिंदेंना यावेळी राजकीय प्रश्न विचारले असता त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं. मात्र मिलिंद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार का, यांच्याबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्या याबाबत काहीच माहिती नसल्याचं स्पष्ट सांगितलं.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यं तसंच सडेतोड भूमिकेमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील नेपोटिझम ते राजकारणातील विषयांवर अनेकदा तिने जाहीरपणे भूमिका मांडली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना कंगनाने अनेक मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. मुंबई महापालिकेने कंगनाचे मुंबईतील घर अतिक्रमणाचे कारण देऊन पाडले होते. मात्र कंगनाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचे कौतुक केले होते. या कंगना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ५जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने त्यांनी पनवेल येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मनपा शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ५जी मुळे मोठी क्रांती होईल असा विश्वास व्यक्त केला.

पुढील बातम्या