मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde: मिलिंद नार्वेकर तुमच्या गटात येतायत का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

Eknath Shinde: मिलिंद नार्वेकर तुमच्या गटात येतायत का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

Oct 01, 2022, 06:36 PM IST

    • Eknath Shinde on Milind Narvekar: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक व विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर खुद्द एकनाथ शिंदे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde

Eknath Shinde on Milind Narvekar: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक व विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर खुद्द एकनाथ शिंदे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.

    • Eknath Shinde on Milind Narvekar: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक व विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर खुद्द एकनाथ शिंदे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde on Milind Narvekar: शिवसेनेतील ४० आमदार व १२ खासदारांना फोडून राज्याचं मुख्यमंत्रीपद पटकावणारे एकनाथ शिंदे लवकरच उद्धव ठाकरे यांना नवा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनाच आपल्या गटात खेचण्याचे शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या संदर्भात वक्तव्य केल्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: आज यावर प्रतिक्रिया दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

Pune Hoarding Collapse : मुंबईनंतर पिंपरी चिंचवड शहरातही होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान

पनवेलमधील एका शाळेला मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन तेथील डिजिटल सोयीसुविधांची माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना मिलिंद नार्वेकर यांच्या संभाव्य प्रवेशाच्या संदर्भात प्रश्न विचारला. सुरुवातीला त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. मात्र, पत्रकारांनी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यामुळं शेवटी ते बोलले. मला याबद्दल काहीच माहिती नसल्याचं ते म्हणाले.

‘मुख्यमंत्री म्हणून मला अनेक लोक भेटायला येत असतात. भेटत असतात. मात्र काही गोष्टींबाबत मला खरंच माहीत नाही. मी कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाही. मी एकदम ट्रान्सफरंट माणूस आहे. पोटात एक, ओठांत एक असं माझं कधी नसतं. सर्वांना माहीत आहे. तुम्हीही ते पाहिलेलंं आहे. माझं जे काही असते ते स्पष्ट असतं,’ असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दसरा मेळावा अभूतपूर्व होईल!

दसरा मेळाव्याबद्दल एक आकर्षण आहे. दसरा मेळाव्यातून बाळासाहेब आपले विचार मांडत. महाराष्ट्रालाच नव्हे देशाला त्यांच्या भाषणाची उत्सुकता असायची. आम्ही देखील बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका घेऊन पुढं चाललो आहोत. त्यामुळंच एक वेगळा इतिहास आज घडला आहे. ५० आमदार, १२ खासदार व शिवसेनेचे १४ राज्यांतील प्रमुख आमच्यासोबत आलेत. जनतेचं प्रेम आम्हाला मिळतंय. सभा, मेळाव्यांना लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. गणेशोत्सव, नवरात्रीतही मी हा अनुभव घेतोय. लोकांना आमची भूमिका पटलेली आहे. त्यामुळं त्यांचा प्रतिसाद मिळतोय. दसरा मेळाव्यातूनही ते दिसेल,' असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या