मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Cabinet news : शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Cabinet news : शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Mar 11, 2024, 07:51 PM IST

  • Maharashtra cabinet Decision Today: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis, Eknath Shinde ajit Pawar (HT_PRINT)

Maharashtra cabinet Decision Today: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

  • Maharashtra cabinet Decision Today: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Maharashtra Cabinet: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली आज (११ मार्च २०२४) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी एक म्हणजे शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक असेल, अशी घोषणा करण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local Mega Block : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता ‘सुप्रीम’ दिलासा

Mumbai Crime News: विरारमध्ये मद्यधुंद होऊन धिंगाणा घालणाऱ्या तीन तरुणींना अटक; पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण

Narendra Dabholkar Case : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर अंनिस अन् दाभोलकर कुटुंबियांची भूमिका

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एकूण १९ निर्णय घेण्यात आले. ज्यात रेस कोर्सच्या ३२० एकर जागेवर जागतिक दर्जाचे थीम पार्क उभारण्याचा सरकारचा मानस आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोस्टल रोडवरील ३२० एकर आणि रेसकोर्सच्या १२० एकर जागेवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क विकसित करण्यावर चर्चा करण्यात आली.

CAA News : मोदी सरकारचा मोठा निर्णय; आजपासून देशभरात सीएए लागू, काय आहे हा कायदा?

 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील १९ निर्णय

१) बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार.

२) बंद पडलेल्या ५८ गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार.

३) एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी.

४) मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून ८५० कोटी अर्थ सहाय्य घेणार.

५) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र.

६) जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता.

७) राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद.

८) एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने.

९) विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना.

१०) राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प.

११) अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड.

१२) डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश.

१३) मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार.

१४) शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक.

१५) उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ.

१६) ६१ अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता.

१७) आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना.

१८) राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता.

१९) राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना; ५३ कोटी ८६ लाख खर्चास मान्यता.

पुढील बातम्या