मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून सभागृहात हास्यकल्लोळ; फडणवीस म्हणाले, लग्नाची जबाबदारी आम्ही घेऊ!

आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून सभागृहात हास्यकल्लोळ; फडणवीस म्हणाले, लग्नाची जबाबदारी आम्ही घेऊ!

Mar 21, 2023, 06:18 PM IST

  • devendra fadnavis on Aditya thackeray marriage : विधानसभेत आज  आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्यावरून वातावरण हलकेफुलके झाले. फडणवीस म्हणाले की, आदित्यच्या लग्नाची जबाबदारी सरकार घेईल.

assembly budget session

devendra fadnavis on Aditya thackeray marriage : विधानसभेत आज आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्यावरून वातावरण हलकेफुलके झाले. फडणवीस म्हणाले की, आदित्यच्या लग्नाची जबाबदारी सरकार घेईल.

  • devendra fadnavis on Aditya thackeray marriage : विधानसभेत आज  आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्यावरून वातावरण हलकेफुलके झाले. फडणवीस म्हणाले की, आदित्यच्या लग्नाची जबाबदारी सरकार घेईल.

Maharashtra Assembly budget Session : राज्य विधीमंडळाचेअर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अंतिम आठवडा सुरू असून अनेक विषयांना मंजुरी देण्यासाठी सरकारकडून गडबड सुरू आहे. अनेक मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगत असून आरोप व प्रत्यारोपाचा फैरी झडत असतात. अशाप्रकारे सभागृहात नेहमी खडाजंगी पाहिली जात असताना आज विधानसभेत आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा विषय निघाला आणि एकच हशा पिकला. सभागृहातले सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरचे आमदार खळखळून हसले. इतकंच काय आदित्य ठाकरेही दिलखुलासपणे हसताना दिसले.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील कामगारांचा प्रश्न सभागृहासमोर मांडला. कडू म्हणाले की, राज्यभरात २५ ते ३० टक्के प्रकल्पबंद होतात. कामाला असल्यामुळे तरुणांची लग्ने जमतात. मात्र बेरोजगार झाल्यावर लग्ने तुटत आहेत. यासाठी सरकारने काहीतरी धोरण आखणे गरजेचे आहे. एखादा मोठा प्रकल्प होतो तेव्हा कामगार गाव सोडून येतात. प्रकल्प बंद पडल्यावर तो कामगार कुटुंबासह रस्त्यावर येतो. कामगार आहे म्हणून लग्न केलं, आता लग्न तुटलं तर कोण जबाबदार याला? असा सवाल बच्चू कडूंनी विचारला. सरकारने जबाबदारी घ्यावी असंही बच्चू कडू म्हणाले.

याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसम्हणाले की, लग्न लावून देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि तुटलं तरी त्याची जबाबदारी ही सरकारची आहे,पण तुम्ही प्रश्न केला तो तपासून पाहिला जाईल. पण तुम्ही हा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडे बघून विचारला का,असा मिश्किल चिमटा फडणवीस यांनी काढला.

यावर लगेच आदित्य ठाकरे उभे राहिले आणि म्हणाले की, “ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का? लग्न लावून देऊ किंवा आमच्यासोबत बसा. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणाचंही तोंड बंद कसं करायचं याचा उत्तम उपाय म्हणजे लग्न. मी अनुभवावरूनच बोलतो आहे. सरकार लग्नाची जबाबदारी घेईल असं जेव्हा फडणवीस म्हणाले तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला.

 

पुढील बातम्या