मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत उद्धव ठाकरेंच्या भेटीला; फोटो शेयर करत आदित्य ठाकरे म्हणाले...

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत उद्धव ठाकरेंच्या भेटीला; फोटो शेयर करत आदित्य ठाकरे म्हणाले...

Mar 18, 2023 04:31 PM IST

Superstar Rajinikanth In Mumbai : दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांनी मातोश्री बंगल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

Superstar Rajinikanth Meet Uddhav Thackeray
Superstar Rajinikanth Meet Uddhav Thackeray (HT)

Superstar Rajinikanth Meet Uddhav Thackeray : मुंबईच्या दौऱ्यावर असलेले दिग्गज अभिनेते रजनीकांत यांनी आज राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्री बंगल्यावर भेट घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी या भेटीचा फोटो शेयर करत माहिती दिली असून ऐन मुंबई महापालिकेच्या तोंडावर रजनीकांत यांनी ठाकरेंची भेट घेतल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. रजनीकांत आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेट ही राजकीय नसून सदिच्छा भेट असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु राजकीय संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरेंची थेट रजनीकांत यांनी भेट घेतल्यामुळं राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

रजनीकांत हे काही पहिल्यांदाच मातोश्रीवर आलेले नाहीत. यापूर्वी २००८ साली रोबोट या चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी ते मुंबईत आले असता त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली होती. त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे कुटुंबियांशी चांगले संबंध असल्यामुळंच रजनीकांत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. आदित्य ठाकरेंनी या भेटीचा एक फोटो शेयर करत रजनीकांत पुन्हा एकदा मातोश्रीवर आल्यामुळं आनंद झाल्याचं म्हटलं आहे. यावेळी रजनीकांत यांच्यासोबत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

थलायवाने लुटला क्रिकेट सामन्याचा आनंद...

मुंबई दौऱ्यावर आलेल्या रजनीकांत यांनी काल भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या वनडे सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली. थलायवा स्टेडियमवर उपस्थित असल्यामुळं चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्याचबरोबर रजनीकांत यांच्यासह राज्यपाल रमेश बैस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि इतर मान्यवरांनी मॅच पाहण्यासाठी हजेरी लावली होती.

WhatsApp channel