मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kopargaon Murder: कोपरगाव हादरले! प्रेमप्रकरणाची माहिती घरी दिल्यानं लहान बहिणीचा खून

Kopargaon Murder: कोपरगाव हादरले! प्रेमप्रकरणाची माहिती घरी दिल्यानं लहान बहिणीचा खून

Oct 07, 2022, 10:01 AM IST

    • Sister killed her sister in Kopargaon : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे एक धक्कादायक घटना उघकीस आली आहे. प्रेम प्रकरणाची माहिती घरच्यांना दिली म्हणून मोठ्या बहिणीने लहान बहिणीचा प्रियकराचा मदतीने हत्या केल्याचे उघड झाले आहे.
Maharashtra Crime News (HT_PRINT)

Sister killed her sister in Kopargaon : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे एक धक्कादायक घटना उघकीस आली आहे. प्रेम प्रकरणाची माहिती घरच्यांना दिली म्हणून मोठ्या बहिणीने लहान बहिणीचा प्रियकराचा मदतीने हत्या केल्याचे उघड झाले आहे.

    • Sister killed her sister in Kopargaon : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे एक धक्कादायक घटना उघकीस आली आहे. प्रेम प्रकरणाची माहिती घरच्यांना दिली म्हणून मोठ्या बहिणीने लहान बहिणीचा प्रियकराचा मदतीने हत्या केल्याचे उघड झाले आहे.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव एका घटनेने हादरले आहे. छोट्या बहिणीने प्रेम प्रकरणाची माहिती घरच्यांना सांगितल्याने मोठ्या बहिणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने खून केला. एवढेच नाही तर खून लपवण्यासाठी तिला फासावर लटकवले. या प्रकरणी आरोपी बहिणीला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. ही घटना कोपरगाव येथील कोकमठाण शिवारात घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

हर्षदा बनकर असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर सृष्टी बनकर असे आरोपी बहिणीचे नाव आहे. सृष्टी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचे सविस्तर वृत असे की, कोकमठाण शिवारात काही दिवसांपूर्वी हर्षदा हीचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या स्थितीत आढळला होता. हर्षदा हिने आत्महत्या केल्याचे प्रारंभी दिसून येत होते. मात्र, प्राथमिक तपासात हा आत्महत्या नसून खून असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी तपास केला असता हा खून तीच्या मोठ्या बहिणीने केल्या असल्याचे पुढे आले. दरम्यान प्रेमप्रकरणाची माहिती तिने घरच्यांना दिल्याने हा खून केल्याचे कळत आहे.

सृष्टी हिचे बाहेर प्रेम प्रकरण सुरू होते. याची घरच्यांना माहिती नव्हती. त्यांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण हर्षदा हिला लागली तिने सृष्टीच्या प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना दिली. सृष्टीचे प्रेमप्रकरण घरच्यांना मान्य नव्हते. यामुळे घरात वाद झाले. दरम्यान, आपले प्रेमप्रकरण हे लहान बहिनीमुळे उघड पडले याची माहिती सृष्टीला मिळाली. तिने रागाच्या भरात बहिणीचा खून करण्याचे ठरवले. यासाठी तिने तिच्या प्रियकराची मदत घेतली . हर्षदा हिला एका निर्जन स्थळी नेऊन तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर आत्महतेचा बनाव करण्यासाठी तिचा मृतदेह झाडाला लटकवला.

हर्षदाचा मृतदेह आढळल्यावर खळबळ उडाली होती. दरम्यान, तपासात हा खून असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला. त्यानुसार सृष्टीने हा खून केल्याचे उघड झाले. तिची कसून चौकशी केल्यावर तिने खून केल्याची कबुली दिली आणि हे कृत्य का केले हे देखील सांगितले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या