मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Crime : DRI ची मोठी कारवाई! मुंबई विमानतळावर तब्बल ८० कोटींचे ड्रग्ज जप्त, आरोपीला अटक

Mumbai Crime : DRI ची मोठी कारवाई! मुंबई विमानतळावर तब्बल ८० कोटींचे ड्रग्ज जप्त, आरोपीला अटक

Oct 06, 2022, 10:26 AM IST

    • Mumbai Crime news : मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ने एका ड्रग्स तस्कराला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ८० कोटी रुपयांचे १६ किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.
Drugs Racket (HT_PRINT)

Mumbai Crime news : मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ने एका ड्रग्स तस्कराला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ८० कोटी रुपयांचे १६ किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.

    • Mumbai Crime news : मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ने एका ड्रग्स तस्कराला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ८० कोटी रुपयांचे १६ किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ने तब्बल ८० कोटी रुपयांचे १६ किलो ड्रग्स जप्त केले आहे. या प्रकरणी एका ड्रग्स तस्कराला अटक करण्यात आली आहे. या तस्कराने ड्रग्ज लपवण्यासाठी आपल्या बॅगेत एक खास व्यवस्था केली होती. त्याने बॅगेत एक बनावट कॅविटीमध्ये कंमपार्टमेंट तयार केलए होते. त्यात हे ड्रग्स लवपवले होते. यामुळे पोलीसही चक्रावले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

बिनू जॉनने असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात ड्रग्स येणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार विमानतळावर सापळा रचण्यात आला होता. संशयित बिनू जॉन याला अटक करण्यात आली. त्याची अधिकाऱ्यांनी झडती घेतली मात्र, त्यांना काहीही सापडले नाही. दरम्यान त्याच्या बॅगेची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी, बॅगेत ड्रग्स लपवण्यासाठी एक कंपार्टमेंट बनवले असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. त्यात एका बनावट कॅविटीमध्ये हे ड्रग्स लपवण्यात आल्याचे दिसले. हे ड्रग्स काढले असता तब्बल १६ किलो असल्याचे आढळले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत तब्बल ८० कोटी रुपये आहे. तसेच जप्त करण्यात आलेले ड्रग्ज हे अतिशय उच्च दर्जाचे आणि घातक असल्याची माहिती समोर आली आहे.

जॉन याची चौकशी केली असता एका परदेशी नागरिकाने त्याला हे ड्रग्ज भारतात आणण्यासाठी तब्बल एक हजार अमेरिकन डॉलर्स कमिशन दिले होते. आरोपी जॉनने इतर साथीदारांची नावे देखील उघड केली. महसूल गुप्तचर संचालनालय आता या नावांची चौकशी करत आहे. तसंच आरोपी बिनू जॉनचा याआधीही भारतातील ड्रग्जच्या तस्करीत सहभाग होता का, याचाही शोध डीआरआय घेत आहे. जॉन सोबत केरळ येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या