मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Crime News: संतापजनक ! मुंबईत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पुणे एक्स्प्रेसवे मार्गाजवळ बलात्कार

Mumbai Crime News: संतापजनक ! मुंबईत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पुणे एक्स्प्रेसवे मार्गाजवळ बलात्कार

Sep 16, 2022, 08:01 PM IST

    • Mumbai Crime News: एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लगतच्या ठिकाणी बलात्कार करण्यात आला.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार (HT)

Mumbai Crime News: एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लगतच्या ठिकाणी बलात्कार करण्यात आला.

    • Mumbai Crime News: एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लगतच्या ठिकाणी बलात्कार करण्यात आला.

मुंबई: राज्यात महिलांवरी आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे या ठिकाणी नेत बलात्कार केला. मुंबईतील वडाळा भागातून या मुलीचे अपहरण करण्यात आले होते.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update : चौथ्या टप्प्यातील मतदानावर अवकाळी पावसाचे सावट! 'या' मतदार संघात मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Police: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, गृह खात्याचा निर्णय

Mumbai Police : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, १०७ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त, ४ जणांना अटक

Mumbai Weather Update : मुंबई, ठाण्यात पुढील ४८ तासांत पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

विशाल वीरकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही ५ सप्टेंबर रोजी कॉलेजमध्ये जात होती. यावेळी वडाळा येथील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेजवळ पीडित मुलगी आली असता आरोपी विशाल वीरकरने बोलेरो कारमध्ये तिला जबरदस्तीने बसवले आणि तिला पुणे एक्स्प्रेस वे येथील एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला.

या नंतर त्याने तिला सोडून दिले. पीडित मुलीने थेट कळंबोली पोलीस ठाण्यात जात या प्रकरणी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को कायद्यातील कलम 4,8 आणि 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या