मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kishtwar Accident : जम्मूच्या किश्तवाडमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात; ७ ठार

Kishtwar Accident : जम्मूच्या किश्तवाडमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात; ७ ठार

May 24, 2023, 10:51 AM IST

    • Kishtwar Accident : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघातात ७ मजूर ठार झाले. या ठिकाणी सुरू असलेल्या धरणाच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन उलटल्याने हा अपघात झाला.
Kishtwar Accident

Kishtwar Accident : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघातात ७ मजूर ठार झाले. या ठिकाणी सुरू असलेल्या धरणाच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन उलटल्याने हा अपघात झाला.

    • Kishtwar Accident : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघातात ७ मजूर ठार झाले. या ठिकाणी सुरू असलेल्या धरणाच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन उलटल्याने हा अपघात झाला.

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीर येथे किश्तवाडमध्ये धरणाच्या कामासाठी जात असलेल्या मंजुरांच्या गाडीचा आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात ७ मजुर ठार झाले आहेत. तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

या घटनेची माहिती अशी की, आज सकाळी एक क्रूझर गाडी काही मजुरांना घेऊन जात होती. येथील डांगदुरु पॉवर प्रोजेक्टजवळ धरणाचे काम सुरू असून या ठिकाणी ही घटना घडली. ही गाडी या प्रकल्पाकडे जात असतांना गडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी पलटली. यात ७ जणांचा मृत्यू झाला.

हा अपघात एवढा भीषण होता की क्रूझर गाडीचा चक्काचूर झाला. दरम्यान, तीन जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही ट्वीट करुन या अपघाताची माहिती दिली आहे. दरम्यान, या घटनेवर लक्ष असून सर्व ती मदत पुरवली जात असल्याचे सिंह यांनी एएनआयशी बोलतांना सांगितले. ते म्हणाले, डंगदुरू प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या दुर्दैवी रस्ता अपघाताबाबत किश्तवाडचे डीसी डॉ. देवांश यादव यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली. असून या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला, तर १ जण गंभीर जखमी आहे. अपघातातील सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात किश्तवाड किंवा जीएमसी, डोडा इथे हलवण्यात येत आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या