मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Mega Block : वीकेंडलाच मुंबईकरांची होणार गैरसोय, तिन्ही मार्गांवर उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block : वीकेंडलाच मुंबईकरांची होणार गैरसोय, तिन्ही मार्गांवर उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक

Jun 17, 2023, 06:45 AM IST

    • Mumbai Local Mega Block : रेल्वे रुळांची पाहणी आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Mumbai Local Mega Block Live Updates (HT_PRINT)

Mumbai Local Mega Block : रेल्वे रुळांची पाहणी आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

    • Mumbai Local Mega Block : रेल्वे रुळांची पाहणी आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Mumbai Local Mega Block Live Updates : आठवडा संपत असताना सुट्ट्या साजऱ्या करण्याच्या विचारात असलेल्या मुंबईकरांची वीकेंडच्याच दिवशी मोठी गैरसोय होणार आहे. कारण आता रेल्वेने मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे. रेल्वे रुळांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळं आता मुंबईकरांना पर्यायी प्रवासाचे मार्ग अवलंबावे लागणार आहे. ठाणे-कल्याण अप, डाऊन जलद मार्ग, पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर, पश्चिम रेल्वे अंधेरी ते गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

कोणत्या मार्गांवर असेल मेगाब्लॉक?

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळं सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल केवळ मुंब्रा आणि दिवा या स्थानकांवरच थांबणार आहे. कल्याणमधून सुटणाऱ्या लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. परिणामी याचा रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन लाईनवर सकाळी ११.०५ ते दुपारी ०४.०५ पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि पनवेलहून बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहे. पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आणि ठाण्यातून पनवेलकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रविवारी म्हणजेच उद्या सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी अंधेरी-गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच राम मंदिर स्थानकात कोणत्याही रेल्वे थांबणार नाहीत. मेगाब्लॉकच्या वेळेत लोकल बोरिवली आणि गोरेगाव पर्यंतच धावणार आहे. याशिवाय अन्य काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार असल्याचंही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पुढील बातम्या