मनी हाईस्टचा देशी अवतार..! तब्बल ८८ हजार कोटींच्या नोटा छापखान्यातून ‘गायब’? अजित पवारांचा खळबळजनक आरोप-ajit pawar big allegation notes worth 88 thousand crores not reach rbi from printing press ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मनी हाईस्टचा देशी अवतार..! तब्बल ८८ हजार कोटींच्या नोटा छापखान्यातून ‘गायब’? अजित पवारांचा खळबळजनक आरोप

मनी हाईस्टचा देशी अवतार..! तब्बल ८८ हजार कोटींच्या नोटा छापखान्यातून ‘गायब’? अजित पवारांचा खळबळजनक आरोप

Jun 16, 2023 08:28 PM IST

88 thousand crores not reach RBI : छापखान्यात छापलेल्या नवीन डिझाईनच्या५००रुपयांच्या अब्जावधी रुपये किंमतीच्या नोटा गायब झाल्याचा खळबळजनक आरोप अजित पवारांनी केला आहे.

अजित पवारांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांचा खळबळजनक आरोप

नाशिक - देशाच्या अर्थव्यवस्थेत खळबळ उडवून देणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडं केंद्र सरकार काळा पैसा शोधण्यासाठी जंग-जंग पछाडत आहे. त्यासाठी नोटबंदीचा महत्त्वाचा निर्णयही सरकारनं घेतला. अलिकडेच दोन हजार रुपयांची गुलाबी नोटही चलनातून बाद करण्यात आली. मात्र छापखान्यात छापलेल्या नवीन डिझाईनच्या ५०० रुपयांच्या अब्जावधी रुपये किंमतीच्या नोटा गायब झाल्याचा खळबळजनक आरोप अजित पवारांनी केला आहे. नोटांच्या छापखान्यात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

अजित पवारांनी आरोप केला आहे की,२०१६मध्ये नोटांच्या कारखान्यात छापलेल्या तब्बल ८८हजार कोटींच्या नोटा सरकारच्या तिजोरीत पोहोचल्याच नाहीत. आरबीआयने यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

नाशिक, देवास आणि बंगळूरू येथील सरकारी छापखान्यातून ५०० रुपयांच्या अब्जावधी मुल्याच्या नोटा गायब झाल्या आहेत. असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला आहे. या नोटा नोटबंदीनंतर २०१६ मध्ये छापल्या होत्या. मात्र त्या सरकारच्या तिजोरीत पोहोचल्याच नाहीत, असा आरोप त्यांनी एका वृत्तपत्राच्या हवाल्यानं केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयच्या २०१६-१७ आर्थिक वर्षाच्याअहवालातही नोटा गायब झाल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. छपाई केलेल्या नोटांपैकी ७, २६० दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेत पोहोचल्याच नाहीत. गायब झालेल्या ५०० रुपयांच्या सर्व नोटा नवीन डिझाईनच्या आहेत. या नोटांचं एकत्रित मूल्य तब्बल ८८ हजार कोटी रुपये इतके आहे. माहिती अधिकारात देखील नोटा गायब झाल्याचं वास्तव समोर आल्याचं सांगितलं जात आहे.

ही बाब फारच गंभीर आहे. या नोटा गेल्या कुठं? त्या कुणी लंपास केल्या? आणि त्यासाठी जबाबदार व्यक्तींवर काय कारवाई झाली? याचा खुलासा सरकारनं करायला हवा, अशी मागणी देखील केली जात आहे.

Whats_app_banner
विभाग