मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Update : ऑक्टोबर हिटनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट, हवामान खात्याचा अंदाज काय?

Weather Update : ऑक्टोबर हिटनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट, हवामान खात्याचा अंदाज काय?

Oct 26, 2023, 07:12 PM IST

    • Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ झालेली आहे. अशातच सामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Maharashtra Weather Update Live Today (HT)

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ झालेली आहे. अशातच सामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

    • Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ झालेली आहे. अशातच सामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Maharashtra Weather Update Live Today : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तेज चक्रीवादळामुळं कोकणासह मध्य महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ झाली असून त्यामुळं नागरिकांना प्रखर उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर हिट लवकरच संपणार असून त्यानंतर आता राज्यात थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांसह सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

गेल्या महिन्याभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात सातत्याने वाढ होत होती. परंतु आता राज्यातील तापमान कमी होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं पुढील महिन्यापासून राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात तापमान नीच्चांकावर आलं आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या तापमानातही सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळं आता ऑक्टोबर हिटनंतर नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सर्वात कमी तापमान हे जळगावात (१३.२ अंश सेल्सिअस) नोंदवण्यात आलं आहे. त्यानंतर महाबळेश्वरचं तापमान १६.०८ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये सरासरी तापमानात मोठी घट होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं आता पुढील महिन्यापासून नागरिकांना शेकोट्या पेटवत उबदार कपड्यांचा वापर करावा लागणार आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळामुळं महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातच्या किनारी भागांमध्ये पुढील एक ते दोन दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाजही आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.

पुढील बातम्या