मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune News : धक्कादायक! पुण्यात पैशासाठी पत्नीचा सौदा; तीन हजार रुपयांत मित्रांना विकले

Pune News : धक्कादायक! पुण्यात पैशासाठी पत्नीचा सौदा; तीन हजार रुपयांत मित्रांना विकले

Apr 04, 2023, 02:07 PM IST

  • Pune Hadapsar Crime news : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नराधम पतीने पैशांसाठी आपल्या पत्नीला विकल्याची घटना उघडकीस आली आहे.

Gondia crime news

Pune Hadapsar Crime news : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नराधम पतीने पैशांसाठी आपल्या पत्नीला विकल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Pune Hadapsar Crime news : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नराधम पतीने पैशांसाठी आपल्या पत्नीला विकल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांनी कळस गाठला आहे. एका नराधम पतीने पैशांसाठी आपल्या पत्नीला वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर तिचा ३ हजार रुपयात मित्रांशी सौदा केला. ही घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली असून या प्रकरणी एका २५ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers theft : पुण्यात वानवडीतील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० किलोचे दागिने लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहितेच्या तक्रारी नंतर पती आणि त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवहीतेच्या पतीला पैशांची गरज होती. मात्र, त्याला कुणीच पैसे देत नव्हते. यामुळे त्याने आपल्या पत्नीला मरण करत तिला जबरदस्तीने उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. हा प्रकार तब्बल २०२० पासून सुरू होता. पातीचा त्रास सहन करत ती हा सर्व प्रकार सहन करत राहिली. यानंतर आरोपीने आपल्याच दोन मित्रांकडून तींन हजार रुपये घेत पत्नीला त्यांच्या सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले.

पीडित महिला ही दोन दिवसांपूर्वी रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिला अडवत जातीवाचक शिवीगाळ करत तिला मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. पीडित महिलेने त्यांना नकार दिल्याने त्यांनी तिला मारहाण केली. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादीने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त देसाई करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या