मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती; १०० टक्के निकालासाठी शाळेनंच फोडला पेपर

HSC Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती; १०० टक्के निकालासाठी शाळेनंच फोडला पेपर

Mar 15, 2023, 12:59 PM IST

  • HSC Paper leak: बारावी गणिताच्या पेपरफूटी प्रकरणी मोठी माहिती मिळत आहे. गणिताचा पेपर सुरू होण्याआधी तब्बल ११९ मुलांना हा पेपर मिळाला होता. शाळेचा निकाल १०० टक्के लागावा या हेतूनं हा पेपर फोडण्यात आला होता.

Exam

HSC Paper leak: बारावी गणिताच्या पेपरफूटी प्रकरणी मोठी माहिती मिळत आहे. गणिताचा पेपर सुरू होण्याआधी तब्बल ११९ मुलांना हा पेपर मिळाला होता. शाळेचा निकाल १०० टक्के लागावा या हेतूनं हा पेपर फोडण्यात आला होता.

  • HSC Paper leak: बारावी गणिताच्या पेपरफूटी प्रकरणी मोठी माहिती मिळत आहे. गणिताचा पेपर सुरू होण्याआधी तब्बल ११९ मुलांना हा पेपर मिळाला होता. शाळेचा निकाल १०० टक्के लागावा या हेतूनं हा पेपर फोडण्यात आला होता.

अहमदनगर : बारावी गणिताच्या पेपरफुटी प्रकरणी मोठी माहिती मिळत आहे. गणिताचा पेपर सुरू होण्याआधी तब्बल ११९ मुलांना हा पेपर मिळाला होता. शाळेचा निकाल १०० टक्के लागावा या हेतून हा पेपर फोडण्यात आला होता. व्हॉट्सअॅपद्वारे हा पेपर सर्वांना पाठवून प्रत्येकाकडून १० हजार रुपये घेण्यात आले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

अहमदनगरच्या मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना या पूर्वी १२ पेपर फुटीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी तपास केला असून तपसादरम्यान अनेक धक्कादायक महिती ही उघड झाली आहे. गणिताचा पेपर सोपवण्यात आलेल्या एचएससी बोर्डाचे सदस्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे ते देखील गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत.

३ मार्च रोजी बारावीच्या गणिताचा पेपर होता. हा पेपर ३ तास आधीच लिक झाला होता. पेपर सुरू होण्याच्या एक तास आधी समाज माध्यमातून हा पेपर तब्बल ११९ मुलांना देण्यात आला. या साठी त्यांच्याकडून प्रत्येकी १० हजार रुपये घेण्यात आले. अहमदनगरच्या विद्यालय सेंटरमध्ये त्यांच्याच विद्यालयाचे तब्बल ११९ मुले आल्याने त्यांच्या विद्यालयाचा निकाल हा १०० टक्के लागावा या हेतूनं हा पेपर फोडण्यात आला. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून गणीतचा पेपर हा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून लिक करण्यात आला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या