मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संभाजीनगर हादरले! बाळ होत नाही म्हणून अघोरी प्रकार, तृतीयपंथीयाचा आत्मा असल्याचं सांगत महिलेच्या अंगावर टोचले खिळे

संभाजीनगर हादरले! बाळ होत नाही म्हणून अघोरी प्रकार, तृतीयपंथीयाचा आत्मा असल्याचं सांगत महिलेच्या अंगावर टोचले खिळे

Apr 26, 2024, 10:59 AM IST

  • Chhatrapati Sambhaji Nagar Gangapur Crime : पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी घटना संभाजीनगर येथील गंगापूर येथे घडली आहे. मूलबाळ होत नसल्यामुळे एका महिलेचा अमानुष छळ करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली.

संभाजीनगर हादरले! 'तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा'; बाळ होत नसल्याने महिलेला अंगावर टोचले खिळे; काठीने मारहाण

Chhatrapati Sambhaji Nagar Gangapur Crime : पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी घटना संभाजीनगर येथील गंगापूर येथे घडली आहे. मूलबाळ होत नसल्यामुळे एका महिलेचा अमानुष छळ करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली.

  • Chhatrapati Sambhaji Nagar Gangapur Crime : पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी घटना संभाजीनगर येथील गंगापूर येथे घडली आहे. मूलबाळ होत नसल्यामुळे एका महिलेचा अमानुष छळ करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली.

Chhatrapati Sambhaji Nagar Gangapur Crime : पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी घटना संभाजीनगर येथे घडली आहे. एका महिलेला मुलबाळ होत नसल्याने तिचा छळ करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली. ऐवढेच नाही तर तुझ्यात तृतीय पंथियाचा आत्मा आहे, असे सांगत तो काढण्यासाठी या महिलेच्या अंगात खिळे खुपसण्यात येऊन तिचा अमानुष छळ केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

JEE Main 2024 Results : विदर्भातील शेतकऱ्याचा मुलगा जेईई परीक्षेत अव्वल; मुंबई आयआयटीमध्ये प्रवेश घेणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही ३५ वर्षांची आहे. ती गंगापुर येथील जामगाव येथील रहिवाशी आहे. दरम्यान, लग्नाला काही वर्ष होऊनही तिला मुलबाळ होत नसल्याने तिच्या सासरची मंडळी तिचा छळ करत होते. ऐवढेच नाही तर तिला अपमानास्पद वागणूक देखील दिली जात होती. तिला मूलबाळ व्हावे या साठी त्यांनी अनेक उपाय देखील केले, दरम्यान, या त्रासाला ही महिला कंटाळली होती. यामुळे एका नतेवाइकाने या महिलेला तिच्या अंगाग तृतीयपंथीयचा आत्मा असल्याचे सांगितले. तो बाहेर काढण्यासाठी जादूटोणा करावा लागेल असा सल्ला देखील दिला. दरम्यान नतेवाईकाचा सल्ला या महिलेने ऐकला आणि जादूटोणा करण्यास ही महिला तयार झाली.

Loksabha Election : ईव्हीएममधील बिघाडाचा खासदाराला फटका! वर्ध्यात भाजप उमेदवार ४० मिनिटे ताटकळले; मतदारांची गैरसोय

तब्बल दोन वर्षांपासून सुरू होता प्रकार

या महिलेला विश्वासात घेऊन तिच्यावर जादूटोण्याचे प्रकार सुरू झाले. तब्बल दोन वर्ष हा अघोरी प्रकार सुरू होता. जादूटोण्याचे विधी करण्यासाठी महिलेला तिच्या घरच्यांनी जामगावला नेले. या गावी आल्यावर पीडित महिलेच्या अंगात असलेला आत्मा बाहेर काढण्यासाठी तिला बेदम मारहाण करण्यात आली. तिला काठीने बदडण्यात आले. मारहाण करून आत्मा निघत नसल्याचे कारण देत महिलेच्या अंगावर खिळे ठोकण्यात आले. दोन वर्ष हा त्रास या महिलेने सहन केला. डिसेंबर २०२२ ते एप्रिल २०२४ पर्यंत हा त्रास पीडितेने सहन केला. अखेर हा त्रास सहन न झाल्याने तिने थेट पोलिसात धाव घेत या बद्दल तक्रार दाखल केली. महिलेसोबत घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस देखील हादरले. त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींविरोधात अघोरी व अनिष्ट प्रथा, नरबळी, अमानुष अत्याचार, जादुटोण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या