मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Har Ghar Tiranga: तिरंगा डीपीला न लावल्याने ट्रोल, RSS ने दिलं स्पष्टीकरण

Har Ghar Tiranga: तिरंगा डीपीला न लावल्याने ट्रोल, RSS ने दिलं स्पष्टीकरण

Aug 04, 2022, 08:21 AM IST

    • राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह सरसंघचालकांनी त्यांचे डीपी बदलले नसल्यानं सोशल मीडियावरून टीका होत आहे. यावर आता आरएसएसने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
तिरंगा डीपीला न लावल्यानं ट्रोल, RSS ने दिलं स्पष्टीकरण (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह सरसंघचालकांनी त्यांचे डीपी बदलले नसल्यानं सोशल मीडियावरून टीका होत आहे. यावर आता आरएसएसने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

    • राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह सरसंघचालकांनी त्यांचे डीपी बदलले नसल्यानं सोशल मीडियावरून टीका होत आहे. यावर आता आरएसएसने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

RSS On Har Ghar Tiranga: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून हर घऱ तिरंगा उपक्रमाबद्दल सांगताना लोकांनी सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचा डीपी लावण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी हातात तिरंगा घेतलेले फोटो डीपीला लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह सरसंघचालकांनी त्यांचे डीपी बदलले नसल्यानं सोशल मीडियावरून टीका होत आहे. यावर आता आरएसएसने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने म्हटले आहे की, अशा गोष्टींचं राजकारण करू नये. हर घर तिरंगा, आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांना आरएसएसने आधीच पाठिंबा दिला आहे. तसंच जुलै महिन्यातच लोकांना आणि स्वयंसेवकांना या कार्यक्रमांना पूर्ण पाठिंबा द्यावा असं सांगण्यात आलं होतं. तसंच आरएससने त्यांना यामध्ये सहभागी होण्याचंही आवाहन केलं होतं. सरकार, खासगी संस्था आणि संघाशी संबंधित संघटनांनी अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावं असंही आवाहन केलं असल्याचं आरएसएसकडून सांगण्यात आले.

आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आरएससला ट्रोल केलं जात आहे त्यावर स्पष्टीकरण दिलं. असे मुद्दे आणि कार्यक्रम राजकारणापासून दूर ठेवले पाहिजेत असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतरसुद्धा RSS.org आणि सरसंघचालकांनी सोशल मीडिया अकाउंटवर तिरंगा डीपीला न लावल्याने आरएसएसला ट्रोल केलं जात आहे.

हर घर तिरंगा मोहिम १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस राबवली जाणार आहे. यामध्ये नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रेरित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचे प्रोफाइल चित्र तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या डीपीचा फोटो बदलला आहे.

पुढील बातम्या