मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हर घर तिरंगा! मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधींनी डीपी बदलला, पण...

हर घर तिरंगा! मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधींनी डीपी बदलला, पण...

Aug 03, 2022, 02:12 PM IST

    • Rahul Gandhi on Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा मोहीम केंद्र सरकारकडून राबवली जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्रोफाइल पिक्चरला तिरंग्याचा फोटो लावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डीपीला लावला तिरंगा (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Rahul Gandhi on Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा मोहीम केंद्र सरकारकडून राबवली जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्रोफाइल पिक्चरला तिरंग्याचा फोटो लावला आहे.

    • Rahul Gandhi on Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा मोहीम केंद्र सरकारकडून राबवली जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्रोफाइल पिक्चरला तिरंग्याचा फोटो लावला आहे.

Har Ghar Tiranga: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आवाहनानंतर केंद्र सरकार देशभरात हर घर तिरंगा अशी मोहिम राबवत आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नाडयू यांनी एका बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीत अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते सहभागी झाले होते. सरकारचे म्हणणे आहे की, "विरोधी पक्षांनी आणि नेत्यांनीसुद्धा या मोहिमेत सहभागी व्हावं. मात्र विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या मोहिमेत सहभाग घेतलेला नाही."

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: रिकाम्या खुर्च्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हरियाणातील रॅलीचा की पुण्यातील सभेचा?

Viral News : लग्नात 'स्मोक पान' खाल्ल्याने मुलीच्या पोटाला पडले छिद्र, मोठा भाग कापावा लागला

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

भाजपने केलेल्या आरोपानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी डीपी बदलत उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी फक्त डीपी बदलला नाही तर त्यासोबत एक मेसेजही लिहिला आहे. राहुल गांधी यांनी तिरंगा असलेला एक फोटो डीपीला लावला आहे. त्यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरी हे हातात तिरंगा घेऊन असल्याचं दिसतं. राहुल गांधी यांनी हा फोटो ट्विट करताना म्हटलं की, "देशाची शान आहे तिरंगा, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे तिरंगा'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटला तिरंग्याचा फोटो लावून सर्वांना आवाहन केलं आहे की, हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हा. यानंतर सोशल मीडियावर यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच केंद्रीय मंत्री, खासदार, भाजप नेत्यांशिवाय अनेकांनी डीपीला तिरंग्याचा फोटो लावला आहे.

देशातील सर्व लोकांना १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावदीत प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या मोहिमेंतर्गत २० कोटी राष्ट्रध्वज फडकावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सोशल मीडियावर डीपीला राष्ट्रध्वज तिरंगा लावणाऱ्या लोकांचे कौतुक केलं आहे.

पुढील बातम्या