मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gautam Adani : गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; ‘सिल्वर ओक’वर एक तास चर्चा, चर्चांना उधाण

Gautam Adani : गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; ‘सिल्वर ओक’वर एक तास चर्चा, चर्चांना उधाण

Dec 28, 2023, 11:33 PM IST

  • Gautam Adani Meet Sharad Pawar : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून एकीकडे उद्धव ठाकरे अदानींना विरोध करत असताना गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Gautam adani meet sharad pawar

Gautam Adani Meet Sharad Pawar : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून एकीकडे उद्धव ठाकरे अदानींना विरोध करत असताना गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • Gautam Adani Meet Sharad Pawar : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून एकीकडे उद्धव ठाकरे अदानींना विरोध करत असताना गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँगेस आणि ठाकरे गट धारावी प्रकल्पावरून अदानींच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना आज अदानी (Gautam adani) यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची पवारांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओकवर भेट घेतली.अदानी आणि पवार यांच्यात अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिसी आहे. यावेळी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने नुकताच मुंबईत भव्य मोर्चा काढला होता.  

शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी अदानी गुरूवारी रात्री पावणे नऊ वाजता पोहोचले आणि या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून धारावी बचाव आंदोलन करत अदानींना विरोध केला जात सताना अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी ग्रुपला दिल्याच्या विरोधात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदानींच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. या मोर्च्यात काँग्रेस आणि शरद पवार गटाचे कार्यकर्तेही सामील झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मागणी केली होती की, सरकारने धारावीचा विकास प्रकल्प अदानींना न देता स्वत: करावा.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या