मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navi Mumbai : नवी मुंबईत महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार; महिन्यातील दुसरी घटना

Navi Mumbai : नवी मुंबईत महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार; महिन्यातील दुसरी घटना

Mar 29, 2023, 09:23 AM IST

  • Firing On Builder : नवी मुंबई परिसरात बांधकाम व्यावसायिकांवर गोलिबाराच्या घटना वाढल्या आहेत. पनवेल परिसरात बांधकाम आणि रियल इस्टेटचा व्यावसाय करणाऱ्या स्नेहल पाटील यांच्यावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

firing

Firing On Builder : नवी मुंबई परिसरात बांधकाम व्यावसायिकांवर गोलिबाराच्या घटना वाढल्या आहेत. पनवेल परिसरात बांधकाम आणि रियल इस्टेटचा व्यावसाय करणाऱ्या स्नेहल पाटील यांच्यावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

  • Firing On Builder : नवी मुंबई परिसरात बांधकाम व्यावसायिकांवर गोलिबाराच्या घटना वाढल्या आहेत. पनवेल परिसरात बांधकाम आणि रियल इस्टेटचा व्यावसाय करणाऱ्या स्नेहल पाटील यांच्यावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

पनवेल : नवी मुंबई आणि पनवेल सध्या गुन्हेगारीचे केंद्रबिंदु होत आहे. पनवेल येथे बांधकाम आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या एका महिला व्यावसाईकावर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत ही महिला किरकोळ जखमकी झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

स्नेहल पाटील असे हल्ला झालेल्या बांधकाम व्यावसायिक महिलेचे नाव आहे. हल्लेखोरांनी मंगळवारी रात्री त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या पायाला गोळी लागली. त्यांना उपचारासाठी नेरुळमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहल पाटील या पनवेलवरुन उरणला जात होत्या. मंगळवारी रात्री, काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. स्नेहल पाटील या त्यांच्या मावस भावासोबत होत्या. त्या गव्हाण फाटा येथे आल्या असता त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

गोळी स्नेहल पाटील यांच्या पायाला लागली. त्यांना तातडीने उपचारासाठी नेरुळ इथल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर झालेला हा हल्ला व्यावसाईक वादातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी १५ मार्च रोजी नेरुळमध्ये सावजी भाई पटेल या बिल्डरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. आरोपींनी बिल्डरवर तीन गोळ्या झाडल्या. ते आपल्या कारने नेरुळच्या अंबिका दर्शन सोसायटीमध्ये जात असताना दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या