मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fire Incident In Aurangabad : वैजापूरमध्ये दुचाकीच्या शोरूमला भीषण आग; मदत व बचावकार्य सुरू

Fire Incident In Aurangabad : वैजापूरमध्ये दुचाकीच्या शोरूमला भीषण आग; मदत व बचावकार्य सुरू

Nov 23, 2022, 09:46 AM IST

    • Fire In Bike Shop In Vaijapur : वैजापूर शहरातील एका दुचाकीच्या शोरूममध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Fire In Bike Shop In Vaijapur Aurangabad (HT)

Fire In Bike Shop In Vaijapur : वैजापूर शहरातील एका दुचाकीच्या शोरूममध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    • Fire In Bike Shop In Vaijapur : वैजापूर शहरातील एका दुचाकीच्या शोरूममध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Fire In Bike Shop In Vaijapur Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरातील एका दुचाकीच्या शोरूमला भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. या घटनेमुळं तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली आहे. याशिवाय अग्निशमन दलालाही या घटनेबाबत कळवण्यात आलं आहे. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, मात्र कोट्यवधींची संपत्ती जळून खाक झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरातील एका दुचाकीच्या शोरूमला सकाळी आग लागल्याचं लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर मोठ्या संख्येनं शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. याशिवाय आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात येणार आहे.

नव्याकोऱ्या दुचाकी आगीत जळून खाक...

काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या निमित्तानं शोरूममध्ये शेकडो नव्या दुचाकी आणण्यात आल्या होत्या. या सर्व दुचाकी शोरूममधील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्या होत्या, परंतु संपूर्ण शोरूमला आग लागल्यानं अनेक नव्याकोऱ्या दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. त्यात अनेक महागड्या दुचाकी असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या