मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Film City Fire : मुंबईत गोरेगाव येथील फिल्मसिटीत मोठी आग, टीव्ही मालिकेचा सेट जळून खाक

Mumbai Film City Fire : मुंबईत गोरेगाव येथील फिल्मसिटीत मोठी आग, टीव्ही मालिकेचा सेट जळून खाक

Mar 10, 2023, 05:57 PM IST

  • Mumbai Goregaon Film City Fire News : मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीमध्ये 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेच्या सेटवर मोठी आग लागली आहे.

Film city Fire

Mumbai Goregaon Film City Fire News : मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीमध्ये 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेच्या सेटवर मोठी आग लागली आहे.

  • Mumbai Goregaon Film City Fire News : मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीमध्ये 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेच्या सेटवर मोठी आग लागली आहे.

Mumbai Film City Fire News : मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीमध्ये मोठी आग लागल्यामुळं खळबळ उडाली आहे. एका टीव्ही मालिकेच्या सेटला ही आग लागली असून आगीत मालिकेचा संपूर्ण सेट जळून खाक झाला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी राहणार बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

maha ssc hsc board result 2024 : प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या हिंदी मालिकेच्या सेटवर सायंकाळी साडेचारच्या सुमारास आग लागली. सुमारे २ हजार चौरस फुटावर पसरलेल्या एका स्टुडिओमध्ये ही आग भडकली. ही आग तळमजल्यापुरतीच मर्यादित असल्याचं सांगितलं जात असलं तरी आगीच्या ज्वाळा पाहता प्रकरण गंभीर असल्याचं दिसत आहे. आजूबाजूच्या सेट्सनाही या आगीची झळ बसली आहे. 'तेरी मेरी दूरियाँ' आणि 'अजुनी' या मालिकेच्या सेट्सना आगीचा फटका बसला आहे. आगीमुळं फिल्मसिटीत एकच घबराट उडाली होती. कर्मचारी व कलाकारांची अक्षरश: पळापळ झाली. आगीचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

ही आग नेमकी कशामुळं लागली हे कळू शकलेलं नाही. सुदैवानं आगीत कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. मात्र, मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन जवानांनी दुर्घटनास्थळी अडकलेल्या अनेक लोकांना सुखरूप बाहेर काढलं आहे. मात्र, तिथं आणखीही काही लोक अडकले असावेत, अशी भीती व्यक्त होत आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या